मुंबई- बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणवला जाणारा अभिनेता आणि त्याची पत्नी यांनी संगनमताने एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. अमीर आणि किरण यांनी ही घोषणा करताच चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला. किरण आणि आमिर २००९ साली लग्नबंधनात अडकले होते. परंतु, आता लग्नाच्या १५ वर्षानंतर त्यांनी एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. यावरून सोशल मीडियावर एकच वादळ उठलं आहे. दुसऱ्या पत्नीला घटस्फोट देण्यावरून आमिरला सोशल मीडियावर ट्रोल केलं जातंय. आता दिग्दर्शक यांनीही या प्रकरणात उडी घेतली आहे. राम यांनी आमिर आणि किरणची बाजू घेत ट्रोलर्सना सुनावलं आहे. अमीर आणि किरण यांनी सोशल मीडियावर अधिकृत घोषणा करत एकमेकांपासून वेगळं होत असल्याचं म्हटलं. त्यानंतर आमिर आणि किरण यांना नेटकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. याप्रकरणात राम यांनी आमिर आणि किरणला पाठिंबा दर्शवला आहे. राम यांनी ट्विट करत नेटकऱ्यांना उलट प्रश्न विचारत आमिरच्या आयुष्यात ढवळाढवळ का करत आहात, असं म्हटलं. राम यांनी ट्विट करत म्हटलं, 'जर आमिर आणि किरण यांना एकमेकांपासून वेगळं व्हायचंय त्यांना एकमेकांना घटस्फोट द्यायला काहीचं हरकत नाहीये तर संपूर्ण जगात इतर कुणाला यात काय अडचण असली पाहिजे? ट्रोलर्स त्यांच्या वैयक्तिक गोष्टीला मुर्खासारखे स्वतःची वैयक्तिक गोष्ट असल्याप्रमाणे ट्रोल करत आहेत.' राम यांचं हे ट्विट सोशल मीडियावर प्रचंड वायरल होत आहे. राम यांच्या ट्विटवर अनेकांनी त्यांच्या प्रतिक्रियादेखील दिल्या आहेत. काहींनी राम यांचं समर्थन केलं तर काहींनी त्यांना विरोध केला. यासोबतच आमिरचे जवळचे मित्र अमीन हाजी यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना म्हटलं, 'माझ्या कुटुंबाला या गोष्टीबद्दल पूर्वीपासूनच माहीत होतं. पण आज ते या गोष्टीचा खुलासा करतील हे फक्त किरण आणि आमिरला माहीत होतं. ते दोघे सध्या त्यांच्या मुलासोबत कारगिल येथे आहेत. ते फक्त कागदोपत्री वेगळे झाले आहेत. परंतु, आताही सोबत आहेत.'
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3ArXfhl