Full Width(True/False)

आजपासून शाओमीचे स्मार्टफोन आणि टीव्ही खरेदी करणे महाग, इतकी वाढली किंमत

नवी दिल्लीः Xiaomi Mobile Phone & SmartTV Price Hike in India : Xiaomi ने आपल्या सर्व स्मार्टफोन आणि स्मार्ट टीव्हीच्या किंमतीत ३ ते ६ टक्क्यांपर्यंत वाढ करीत असल्याची घोषणा केली आहे. स्मार्टफोन आणि स्मार्ट टीव्हीच्या किंमती १ जुलै पासून देशभरात लागू करण्यात आल्या आहेत. याचाच अर्थ आजपासून शाओमीचे स्मार्टफोन आणि स्मार्ट टीव्ही खरेदी करणे महाग झाले आहे. शाओमीने आपल्या स्मार्ट टीव्ही आणि स्मार्टफोन्सच्या किंमतीत ३ ते ६ टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. जर तुम्ही ३० हजार रुपये किंमतीचा टीव्ही खरेदी केला तर तुम्हाला २ हजार रुपये जास्त द्यावे लागणार आहेत. वाचाः किंमत वाढीचे कारण शाओमीच्या म्हणण्यानुसार, कंपनीला कंपोनेंटच्या कमीला सामोरे जावे लागत आहे. सोबत जास्त शिपिंग चार्ज आणि सप्लाय चेनची अडणच आहे. डिमांड आणि सप्लाय मध्ये मिसमॅच होत असल्याने स्मार्टफोन आणि स्मार्ट टीव्हीच्या मॅन्यूफॅक्चरिंगचा वापर करण्यासाठी लागत असलेले पार्ट्स (चिपसेट, डिस्प्ले पॅनल, डिस्प्ले ड्राइवर, बॅक पॅनल आणि बॅटरी) च्या किंमतीत वाढ झाली आहे. या सर्व अडचणींमुळे कंपनीने स्मार्टफोन आणि स्मार्ट टीव्हीच्या किंमतीत वाढ केली आहे. वाचाः अन्य कंपन्याही वाढवू शकतात किंमती शाओमीच्या प्रवक्त्याने सांगितले की, १ जुलै पासून स्मार्ट टीव्हीच्या किंमतीत ३ ते ६ टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. याचप्रकारे स्मार्टफोनच्या किंमतीत वाढ झाली आहे. रिपोर्टच्या म्हणण्यानुसार, ग्लोबल मार्केटमध्ये टीव्ही पॅनेलच्या किंमती वाढल्यामुळे अन्य स्मार्ट टीव्ही निर्माता कंपन्या आपल्या प्रोड्क्ट्च्या किंमतीत ३ ते ४ टक्क्यांपर्यंतची वाढीची घोषणा करू शकते. वाचाः एप्रिल मध्ये वाढवली होती किंमत याआधी एप्रिल महिन्यात स्मार्ट टीव्ही आणि स्मार्टफोनच्या किंमतीत वाढ करण्यात आली होती. त्यावेळी कंपनीने ऑपरेटिंग कॉस्ट वाढल्याचे कारण सांगितले होते. वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3ybhcqJ