Full Width(True/False)

मीरा राजपूतला ऑनलाईन शॉपिंग पडली महागात, मागवलं एक आलं भलतंच

मुंबई : ऑनलाईन खरेदी करताना फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहेत. असाच फसवणुकीचा अनुभव अभिनेता शाहिद कपूरची बायको मीरा राजपूतला आला आहे. तिने आपल्या मोबाईलसाठी एक कव्हर ऑनलाईन मागवले होते. परंतु त्याऐवजी तिला दुसरेच कव्हर पाठवण्यात आले. मीराने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत झालेल्या फसवणुकीची माहिती दिली आहे. मीराने आपल्या आयफोनसाठी एक महागड्या कव्हरची ऑर्डर केली आणि त्याचे ऑनलाईन पेमेंटही तिने केले होते. जेव्हा तिने ऑर्डर केलेले कव्हर आले तेव्हा जे मागवले होते त्याऐवजी भलतेच कव्हर तिला मिळाले. इतकेच नाही तर कव्हरची क्वालिटी देखील खूपच वाईट होती. कव्हरच्या तळाला एक भोक देखील पडलेले होते. हे भोक झाकण्यासाठी चक्क स्टिकर लावला होता. हा प्रकार पाहून मीरा चांगलीच संतापली आणि तिने आपला राग सोशल मीडियाद्वारे व्यक्त केला. मीराने कव्हरचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत एक पोस्ट लिहिली आहे. तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ' एक जाहिरात पाहून मी हे फोन कव्हर ऑनलाईन विकत घेतले…जाहिरातीमध्ये जे कव्हर दाखवले होते ते पाहून मी कव्हर मागवले होते. परंतु मला पाठवण्यात आलेले ते हे कव्हर नाही. हे प्लास्टिकचे कव्हर आहे. मला एक स्लिंग कव्हर पाहिजे होते,जेणेकरून बाहेर फिरायला जाताना मला बॅग घेऊन जायची गरज पडणार नाही. (हो, माझ्या पॅन्टला खिसे नाहीत.) ' असे सांगत मीराने तिची झाल्याची माहिती दिली आहे. मीराच्या या पोस्टवर सोशल मीडियावर खूपच चर्चा होत आहे. काही युझरनी तिला कोणत्या बेवसाईटवरून हे मागवले याबाबत विचारणा केली तर काहींनी तिला याची तक्रार सायबर पोलिसांकडे तक्रार करण्याचा सल्ला देखील दिला आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2TIXR1L