Full Width(True/False)

सॅमसंगच्या ‘या’ स्मार्टफोन्ससाठी मोजावे लागणार अधिक पैसे, कंपनीने वाढवली किंमत

नवी दिल्ली : दक्षिण कोरियाची कंपनी सॅमसंगने भारतात आपल्या तीन स्मार्टफोन्सच्या किंमतीत वाढ केली आहे. यामध्ये एम, एफ आणि ए सीरिजमधील स्मार्टफोन्सचा समावेश आहे. , Galaxy M02s आणि Galaxy F02s च्या किंमतीत जवळपास ५०० रुपये वाढ झाली आहे. नवीन किंमतीसह हे स्मार्टफोन कंपनीची अधिकृत वेबसाइट, Amazon, Flipkart आणि ऑफलाइन रिटेलर्सकडे उपलब्ध आहेत. या फोन्सची किंमतीत किती वाढ झाली आहे, पाहुयात. वाचाः Galaxy A12: या फोनच्या ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १२,९९९ रुपये होती. मात्र आता ५०० रुपये वाढ झाल्याने फोन १३,४९९ रुपये किंमतीत उपलब्ध आहे. तर याच्या ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १३,९९९ रुपये होती. परंतु, ५०० रुपये वाढ झाल्याने फोनसाठी १४,४९९ रुपये मोजावे लागतील. Samsung Galaxy M02s: फोनच्या ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेजच्या व्हेरिएंटची किंमत ८,९९९ रुपये होती. मात्र, ५०० रुपये वाढ झाल्याने फोन ९,४९९ रुपयात मिळेल. तसेच, ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंट देखील ५०० रुपये वाढ झाल्यानंतर १०,४९९ रुपये किंमतीत उपलब्ध आहे. वाचाः Samsung Galaxy F02s: Samsung Galaxy F02s स्मार्टफोनच्या ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ८,९९९ रुपये होती. मात्र किंमतीत ५०० रुपयांनी वाढ झाल्याने आता ९,४९९ रुपये मोजावे लागतील. तर ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ९,९९९ रुपये होती. आता याची किंमत ५०० रुपयांनी वाढली आहे. किंमत वाढल्यानंतर फोन १०,४९९ रुपयात उपलब्ध आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3xtI5GH