मुंबई- अभिनेत्री यांचे पती यांचे बुधवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. यापूर्वी रविवारी त्यांनी झहीर खान, सागरिका घाटगे, आशिष चौधरी, समिता बंगारगी, नेहा धुपिया आणि अंगद बेदी यांच्यासोबत एक छोटेखानी पार्टीही केली होती. तोपर्यंत ते अगदी ठणठणीत होते. मात्र सोमवारी अचानक आलेल्या या बातमीमुळे साऱ्यांनाच धक्का बसला. ई- टाइम्सने संगीत दिग्दर्शक सुलेमान मर्चंट यांच्याशी राज कौशलविषयी बोलले आहे. मंदिरा बेदी आणि राज कौशल यांचे जवळचे मित्र सुलेमान मर्चंट यांनी सांगितले की, रविवारी संध्याकाळपासूनच राज कौशल यांना अस्वस्थ वाटत होतं. त्यावर उपाय म्हणून त्यांनी एक गोळी घेतली. रात्रीची वेळ होती त्यानंतर पहाटे ४ वाजता त्यांना अधिक अस्वस्थ वाटू लागले. डॉक्टरांना बोलावून उपचार सुरू होतील त्याआधी पहाटे ४.३० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सुलेमान मर्चंट आणि त्यांची पत्नी रेश्मा मर्चंट बुधवारी संध्याकाळी मंदिरा बेदीच्या घरी तिला भेटायला गेले होते. सुलेमान मर्चंट पुढे म्हणाले, 'राजने मंदिराला सांगितले की त्यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. यानंतर मंदिराने जराही वेळ न घालवता आशिष चौधरीला फोन केला. आशिष आणि मंदिराने राज यांना गाडीत बसवले तेव्हा ते बेशुद्ध होते. जर मी चुकीचं काही सांगत नाहीए तर मला वाटतं की इस्पितळात नेलं जात असतानाच राज यांचं निधन झालं. त्यांची नाडी मिळेनाशी झाली. डॉक्टरांकडे जाण्यापूर्वी खूप उशीर झाला होता.' सुलेमान मर्चंट यांनी सांगितले की राज कौशल यांना यापूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. 'मला वाटते की त्यावेळी तो ३०-३२ वर्षांचा होता पण त्या झटक्यानंतर त्याने स्वतःची खूप काळजी घेतली होती आणि तेव्हापासून राज कौशल ठीक होता.' सुलेमान मर्चंट म्हणाले की, 'मी २५ वर्षांची मैत्री गमावली. जेव्हा मी त्याला तेव्हापासून ओळखतो जेव्हा तो 'दस' सिनेमासाठी मुकुल आनंदचा सहाय्यक दिग्दर्शक होता. महामारी सुरू होण्याच्या आधी मी त्यांच्या घरी गेलो होतो. त्याच्या पहिल्या 'प्यार में कभी कभी' या चित्रपटाला सलीम आणि मी संगीत दिले होते. मी बर्याचदा त्याच्या संपर्कात असायचो. जेव्हा आम्ही 'भूमी २०२०' या अल्बमवर काम सुरू केले तेव्हा राजने आम्हाला त्याचा मढ आयलंड येतील बंगला देऊ केला होता. हा बंगला तो अनेकदा भाड्याने द्यायचा. पण आम्ही तिथे शूट केले नाही.'
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3dBt7q6