नवी दिल्ली. स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) पुन्हा एकदा आपल्या ग्राहकांसाठी अलर्ट जारी केला आहे. यात ग्राहक त्यांचा वैयक्तिक आणि आर्थिक डेटा चोरीपासून कसा वाचवू शकतील याबद्दल सांगण्यात आले आहे . ग्राहकांच्या माहितीला धोका असल्याचा इशारा देत एसबीआयने आपल्या ग्राहकांना सेफ्टी टिप जारी केली आहे. यात, जे Apps व्हेरीफाईड नाहीत अशा कोणत्याही स्रोताकडून अॅप्स डाउनलोड करू नयेत असा सल्ला बँकेने एसबीआय ग्राहकांना दिला आहे. वाचा: एसबीआयतर्फे ट्विटर अकाऊंटवर ट्विट करण्यात आले आहे की 'तुमची सुरक्षा ही आमची प्राथमिकता आहे! या सुरक्षिततेबद्दल जाणून घ्या जे आपला वैयक्तिक आणि आर्थिक डेटा चोरीपासून वाचवू शकते. 'केवळ सत्यापित स्त्रोतांवरून अॅप्स डाउनलोड करा. अज्ञात व्यक्तीच्या सल्ल्यानुसार कोणतेही अॅप डाउनलोड करु नका. असेही एसबीआयतर्फे सांगण्यात आले. देशातील सर्वात मोठ्या बँकेतर्फे सांगण्यात आले आहे की, ग्राहकांना सतर्क राहण्याची गरज आहे. कारण, फसवणूक करणारे ओटीपी, पिन आणि सीव्हीव्ही सारखी माहिती रिमोटली वाचू शकतात. गेल्या आठवड्यात एका सायबर सुरक्षा संशोधकाने असा इशारा दिला होता की चीनमधील हॅकर्स फिशिंग घोटाळ्यांद्वारे एसबीआय ग्राहकांना लक्ष्य करीत आहेत. हे हॅकर्स ५० लाख रुपयांच्या भेटवस्तू आणि वेबसाइट लिंकसह व्हॉट्सअॅप संदेशाद्वारे केवायसी अपडेट करण्यास सांगत आहेत. दिल्ली स्थित सायबरपीस फाउंडेशनच्या सहकार्याने ऑटोबोट इन्फोसेक प्रायव्हेट लिमिटेड. लि. एसबीआयच्या संशोधकाने अशा दोन घटनांची माहिती दिली ज्याद्वारे काही स्मार्टफोन युजर्सना एसबीआयच्या नावाखाली फसविण्यात आले. मार्चच्या सुरुवातीला याच संशोधन पथकाने असे सांगितले होते की, फिशिंग घोटाळ्यांमधून अनेक एसबीआय युजर्सनाना लक्ष्य केले जात आहे. या युजर्सना मजकूर संदेश पाठवून त्यांच्या ९,८७० रुपयांच्या एसबीआय क्रेडिट पॉईंटची पूर्तता करण्यास सांगण्यात आले असल्याची माहिती आयएएनएसच्या अहवालात समोर आली आहे. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3keeblY