Full Width(True/False)

'डोंबिवलीत काय फक्त मराठी माणसंच घर घेतात का?' ट्रोल करणाऱ्यांवर भडकली प्रिया बापट

मुंबई- मराठी भाषा आपली मातृभाषा आहे तर हिंदी भाषा आपली राष्ट्रभाषा आहे. आपण बोलत असलेल्या भाषेचा आपल्याला नेहमीच अभिमान वाटतो. सोशल मीडियावरही आपण अनेकदा भाषेवरून वाद होताना पाहतो. परंतु, समोरच्याने कोणत्या भाषेत बोलायचं हे ठरवण्याचा अधिकार आपल्याला नसल्याचं नेटकरी कधीकधी विसरून जातात. त्यातही जर मराठी कलाकार हिंदी भाषिक जाहिराती किंवा चित्रपट करत असतील तर त्यांनाही सोशल मीडियावर नेटकऱ्यांचा रोष सहन करावा लागतो. असंच काहीसं घडलंय मराठमोळी अभिनेत्री सोबत. एका हिंदी भाषेतील जाहिरातीवरून प्रियाला ट्रोल करण्यात आलं. परंतू, प्रियानेही ट्रोलर्सला खडे बोल सुनावत आपली बाजू मांडली आहे. प्रिया आणि उमेश कामत मराठी प्रेक्षकांच्या आवडत्या जोड्यांपैकी एक आहेत. प्रियाने उमेशसोबत नुकतीच एक जाहिरात केली आणि ती सोशल मीडियावर पोस्टही केली. परंतु, ती जाहिरात हिंदीमध्ये असल्याने अनेक नेटकऱ्यांनी प्रियाला ट्रोल करायला सुरुवात केली. तुम्ही मराठी असूनही आपली अस्मिता न जपता पैशांसाठी हिंदी जाहिराती करता. डोंबिवलीत बहुतांश मराठी माणसं राहतात तरीही मराठीला डावललं गेलं, असं म्हणत तिला ट्रोल करण्यात आलं. त्यावर प्रियानेही ट्रोलर्सला सुनावलं आहे. प्रियाने युझर्सना उत्तर देताना लिहिलं, 'घर काय फक्त मराठी माणसंच घेतात का? माझी मातृभाषा मराठी आहे म्हणजे भारतात फक्त मराठीच बोलतात का?' नेटकऱ्यांना इतर भाषेतील चित्रपट का पाहता असं विचारत प्रियाने लिहिलं, 'मग तुम्ही हिंदी चित्रपट, इंग्रजी वेबसीरिज का बघता? एकीकडे मराठी कलाकरांना सतत विचारायचं तुम्ही हिंदीत काम का करत नाही आणि दुसरीकडे जर सगळ्यांना समजेल अशा भाषेत जाहिरात केली तर असे टोमणे मारायचे. तुमच्या दुटप्पीपणाचं दुःख वाटतं.' अनेक नेटकऱ्यांनी प्रियाची बाजू घेत तिला पाठिंबा दिला तर काही इतकऱ्यांनी या स्पष्टीकरणानंतरही तिला चुकीचं म्हटलं. कलाकारावर भाषेचं बंधन घातल्याने त्याची वाढ खुंटते त्यामुळे प्रिया त योग्य केलंस, असं म्हणत काही चाहत्यांनी प्रियाला पाठिंबा दिला आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3ykvm99