Full Width(True/False)

WhatsApp वर कॉल रेकॉर्डिंगची प्रोसेस आहे अगदी सोप्पी, पाहा टिप्स

नवी दिल्ली: WhatsApp वर अनेक फीचर आहे ज्यांच्या मदतीने चॅटिंगची मजा अधिक वाढते. कदाचित म्हणुनच हे App बरेच लोकप्रिय आहे आणि युजर्स चॅटिंग, व्हिडिओ कॉलिंग आणि व्हॉईस कॉलिंगसाठी या App लाच प्राधान्य देतात. परंतु, बरेचदा काही महत्त्वाच्या कामानिमित्त व्हॉट्स अ‍ॅपवर कॉल्स रेकॉर्ड करायचे असतात. पण, ते मात्र यात शक्य नाही. व्हॉट्सअॅपने असे कोणतेही रेकॉर्डिंग फीचर अर्थात बटण दिले नाही, अशात काही टिप्स वापरून तुम्ही अगदी सोप्या मार्गाने व्हॉट्सअ‍ॅपवर कॉल रेकॉर्ड करू शकता. जाणून घ्या या टिप्सबद्दल सविस्तरपणे ज्या कॉल रेकॉर्डिंगमध्ये तुमची मदत करतील. वाचा : असे करा Android वर रेकॉर्ड यासाठी प्रथम आपल्याला आपल्या मोबाइलमध्ये थर्ड पार्टी अ‍ॅप डाउनलोड करावे लागेल. यासाठी Google Play Store वर जाऊन क्यूब कॉल रेकॉर्डर डाउनलोड करावे लागेल. नंतर क्यूब कॉल रेकॉर्डर उघडून सेटअप करा आणि नंतर व्हॉट्सअ‍ॅपवर जा. आता आपणास ज्यांच्यासोबत बोलायचे आहे त्यांना WhatsApp कॉल करा. दुसरीकडे, कॉल दरम्यान विजेट किंवा क्यूब कॉलचे चिन्ह दिसेल, ते दिसत असेल तर, याचा अर्थ असा की ते कार्यरत आहे. हे App तुम्हाला स्वत: च्या जोखमीवर वापरावे लागेल. सेटिंग करू शकता परंतु जर यात काही अडचण असेल तर अॅप उघडा आणि सेटिंग्जवर जा आणि सक्तीने व्हीओआयपी पर्याय निवडा. मग पुन्हा कॉल करा. इतर कोणती समस्या असल्यास कदाचित ही युक्ती आपल्या स्मार्ट फोनमध्ये काम करत नसेल. आधीच सांगितल्याप्रमाणे या ट्रिक्स वापरून कॉल अगदी सहज रेकॉर्ड करता येईल. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2V1o0ck