मुंबई: काही दिवसापूर्वी अभिनेत्री यांची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट झाल्याचं वृत्त समोर आलं होतं. '' फेम अभिनेत्री सविता बजाज यांनी लोकांकडे मदत मागितली होती. यासोबतच त्यांना वेगवेगळे आजार असून त्यावर उपचार करुन घेण्याचे पैसेही नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर अनेक सेलिब्रेटींनी सविता बजाज यांना मदतीचा हात दिला होता. पण आता सविता बजाज तब्येत बिघडली असून सध्या त्या आयसीयूमध्ये असल्याची माहिती मिळत आहे. एका हिंदी वेबसाइटशी बोलताना अभिनेत्री नुपूर अलंकारनं याची पुष्टी केली आहे. सविता यांची प्रकृती आता स्थीर असून त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं आहे. त्यांना डॉक्टरांच्या निरिक्षणाखाली ठेवण्यात आलं असून सध्या नुपूर अलंकारच सविता बजाज यांची काळजी घेत आहे. सविता बजाज यांना श्वसनाचा त्रास आहे. काही दिवसांनी त्यांना जनरल वॉर्डमध्ये पाठवण्यात येणार आहे. पण सध्या त्यांची जी परिस्थिती आहे ती पाहता त्यांना व्हेंटिलेशनमध्ये राहण्याची गरज असल्याचं नुपूर अलंकारनं सांगितलं. सविता बजाज यांच्याबद्दल बोलताना नुपूर अलंकारनं सांगितलं, 'सविता बजाज मुंबईमध्ये ज्या घरात राहतात त्या ठिकाणी एकही खिडकी नाही. किंवा अशी कोणतीही सोय नाही ज्याने हवा खेळती राहिल. त्यामुळे सविता बजाज यांना श्वास घेताना त्रास होत आहे. अशा परिस्थितीत चाळीतल्या अशा खोलीत राहणं त्यांच्यासाठी योग्य नाही. अशा परिस्थितीत नुपूरनं सविता बजाज यांची वृद्धाश्रमात सोय करण्यासाठीही प्रयत्न केले होते. पण त्या ठिकाणीही त्यांची कोणतीही सोय होऊ शकली नाही ' दरम्यान अनेक सेलिब्रेटींनी सविता बजाज यांना मदतीचा हात दिला आहे. 'नदिया के पार' चित्रपटातील त्यांचे सहकलाकार सचिन पिळगांवकर आणि त्यांची पत्नी सुप्रिया यांनी मदत केली होती. याशिवाय इतर काही कलाकांरांनीही सविता बजाज यांना मदतीचा हात दिला आहे. ७९ वर्षीय सविता बजाज यांनी ५० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ज्यात 'निशांत', 'नजराना' आणि 'बेटा हो तो ऐसा' या चित्रपटांचा समावेश आहे. याशिवाय त्यांनी 'नुक्कड़', 'मायका' आणि 'कवच' या मालिकांमध्येही काम केलं आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3zuEfgK