नवी दिल्ली : चीनी निर्माता कंपनी ने आपला स्वस्त ५जी फोन ची भारतात विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने भारतासाठी ५जी चे प्रोडक्शन बंद केले आहे. त्यामुळे स्टॉकमध्ये असलेल्याच फोनची विक्री होणार आहे. नॉर्डला कंपनीने २१ जुलै २०२० रोजी सादर केले होते. बरोबर एक वर्षानंतर आता कंपनीने याचे उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ची सुरुवाती किंमत २४,९९९ रुपये आहे. वाचा: OnePlus Nord स्मार्टफोन Nord सीरिजमधील एंट्री लेव्हल फोन होता. गेल्या वर्षभरात कंपनीने या सीरित अंतर्गत ला आणि नुकतेच ला लाँच केले आहे. हे दोन्ही स्मार्टफोन अपडेटेड फीचर्ससोबत येतात. यांची किंमत देखील जवळपास वनप्लस नॉर्ड ५जी एवढीच आहे. त्यामुळे कंपनीने आता या फोनला बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. OnePlus Nord चे स्पेसिफिकेशन्स OnePlus Nord मध्ये ६.४४ इंच एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. याचा रिफ्रेश रेट ९० हर्ट्ज आहे. फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७६५जी चिपसेट सपोर्ट मिळतो. हा फोन अँड्राइड १० वर आधारित ऑक्सिजन ओएसवर काम करतो. वाचा: यामध्ये रियरला क्वाड कॅमेरा सेटअप मिळेल. यात ४८ मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, ८ मेगापिक्सल अल्ट्रा वाइड लेंस, ५ मेगापिक्सल डेप्थ सेंसर आणि २ मेगापिक्सल मॅक्रो लेंस मिळेल. सेल्फीसाठी यात ड्यूल पंच-होल कॅमेरा मिळतो. यात ३२ मेगापिक्सल आणि ८ मेगापिक्सल असे दोन कॅमेरे मिळतात. फोनमध्ये पॉवरसाठी ३०टी वार्प चार्जिंग सपोर्टसह ४,११५ एमएएचची दमदार बॅटरी मिळेल. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3hYuEsL