Full Width(True/False)

Nokia 105 4G ची किंमत उघड, पाहा फोनची सर्व डिटेल्स

नवी दिल्लीः फोनची किंमत उघड झाली आहे. नोकियाच्या या फोनमध्ये वायरलेस एफएम रेडिओ आणि इनबिल्ट एलईडी टॉर्च देण्यात आली आहे. फोनला 4G VoLTE सपोर्ट दिला आहे. हा फोन एन्ट्री लेवल फीचर फोन आहे. HMD Global कंपनी ने Nokia 105 4G सोबत Nokia 110 4G ला लाँच केले होते. Nokia 110 फोन कॅमेरासोबत येतो. परंतु, Nokia 105 4G मध्ये कॅमेरा दिला नाही. वाचाः Nokia 105 4G ची किंमत Nokia 105 4G ची किंमत CNY 229 म्हणजेच जवळपास २ हजार ६०० रुपये आहे. या फोनला चीनमध्ये ब्लॅक, ब्लू, आणि रेड कलर ऑप्शन मध्ये आणले गेले आहे. फोनला प्री बुकिंगसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. याची शिपिंग ५ जुलै पासून सुरू होणार आहे. प्री बुकिंग ग्राहक CNY 199 म्हणजेच २ हजार ३०० रुपयात खरेदी करू शकता. या फोनला भारतात कधीपर्यंत लाँच केले जाणार आहे, याची माहिती अद्याप देण्यात आली नाही. वाचाः Nokia 105 4G चे फीचर्स फोनला ड्युअल सिम सपोर्ट सोबत येते. या फोनमध्ये १ इंचाचे QQVGA कलर डिस्प्ले दिली जाणार आहे. याचा रिझॉल्यूशन 120x160 पिक्सल असेल. फोन Unisoc T107 SoC प्रोसेसर सपोर्ट सोबत येतो. यात 128MB ची रॅम आणि 48MB ऑनबोर्ड स्टोरेज दिले जाणार आहे. फोनमध्ये मायक्रो एसडी कार्डचा सपोर्ट दिला आहे. याच्या मदतीने ३२ जीबी पर्यंत वाढवता येऊ शकते. कनेक्टिविटी ऑप्शन म्हणून फोन मध्ये 4G LTE, FM radio, Micro-USB आणि एक 3.5mm हेडफोन जॅक दिला आहे. Nokia 105 4G मध्ये प्री-इंस्टॉल गेम, इंटरनेस ब्राउजर सपोर्ट दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 1,020mAh ची बॅटरी दिली आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3dvXNZP