नवी दिल्लीः टेलिकॉम कंपनी वोडाफोन आयडियाच्या युजर्संसाठी प्रत्येक किंमतीत बेस्ट प्रीपेड प्लान ऑफर करीत आहे. कंपनीच्या पोर्टफोलियोत १८ दिवसांपासून ३६५ दिवसांपर्यंत वैधतेचे प्लान आहेत. या प्लानमध्ये कंपनी बेस्ट डेली डेटा बेनिफिट सोबत फ्री कॉलिंग आणि पॉप्यूलर ओटीटी अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन ऑफर करते. यूजर्संना सध्या २८ दिवसांची वैधता असलेले प्लान पसंत पडत आहेत. जाणून घ्या वोडाफोन आयडियाच्या अशाच काही प्लानसंबंधी. ज्यात ५६ दिवसांच्या वैधते सोबत कंपनी डेली ४ जीबी पर्यंत डेटा आणि फ्री कॉलिंग शिवाय, अनेक बेनिफिट ऑफर करते. वाचाः Vi चा ४४९ रुपयांचा प्लान ५६ दिवसांचा वैधतेसोबत येणाऱ्या या प्लान मध्ये कंपनी रोज ४ जीबी डेटा ऑफर करीत आहे. या प्लानमध्ये तुम्हाला देशात कुठेही कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज १०० फ्री एसएमएस दिले जाते. प्लानमध्ये कंपनी बिंज ऑल नाइट बेनिफइट सुद्धा देत आहे. या अंतर्गंत युजर रात्री १२ ते सकाळी ६ वाजेपर्यंत अनलिमिटेड डेटा खर्च करू शकते. प्लानमध्ये Vi Movies आणि TV क्लासिक्सचे फ्री अॅक्सेस दिले जाते. Vi चा ३९९ रुपयांचा प्लान या प्लानमध्ये कंपनी देशात कोणत्याही नेटवर्कसाठी अनलिमिटेड कॉलिंग ऑफर करीत आहे. प्लानमध्ये इंटरनेट युसेज साठी डेली १.५ जीबी डेटा दिला जातो. रोज १०० फ्री एसएमएस ऑफर करणाऱ्या या प्लानमध्ये विकेंड डेटा रोलओवर बेनिफिट दिले जाते. प्लानचे आणखी एक खास वैशिष्ट्ये म्हणजे युजर्संना यात ४० रुपयांचे डिस्काउंट कूपन मिळते. ज्यात वोडाफोन आयडियाच्या पुढच्या रिचार्ज मध्ये वापर करता येतो. वाचाः Vi चा ६०१ रुपयांचा प्लान ५६ दिवसांची वैधता असलेल्या या प्लानमध्ये तुम्हाला रोज ३ जीबी डेटा मिळतो. ट्रूली अनलिमिटेड कॉलिंग आणि डेली १०० एसएमएस ऑफर करणाऱ्या या प्लानमध्ये कंपनी विकेंड डेटा रोलओवरचे बेनिफिट देत आहे. प्लानचे आणखी एक खास वैशिष्ट्ये म्हणजे यात तुम्हाला एक वर्षापर्यंत डिज्नी प्लस हॉटस्टार व्हीआयपीचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते. Vi चा ५५८ आणि ५९५ रुपयांचा प्लान ५९५ रुपयांच्या प्लानमध्ये कंपनी ५६ दिवसांची वैधता शिवाय, रोज २ जीबी डेटा देते. प्लानमध्ये युजर्संना १०० एसएमएस आणि कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग दिली जाते. याशिवाय, प्लानमध्ये सब्सक्राइबर्संना जी ५ प्रीमियमचे १ वर्षापर्यंत सब्सक्रिप्शन फ्री मिळते. या प्लानमध्ये युजर्संना विकेंड डेटा रोलओवर बेनिफिट ऑफर केले जाते. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2TPm3iM