नवी दिल्ली : Smartphone खरेदी करण्याची ही एक उत्तम संधी आहे. Amazon मोबाईल सेव्हिंग डेज सेल सुरु असून यात खरेदीदारांना इंडसइंड बँक आणि किंवा ईएमआय पेमेंटवर १० % सूट (१,२५० रुपयांपर्यंत) दिली जात आहे. जस्ट फॉर प्राइम योजनेअंतर्गत एचडीएफसी बँकेच्या कार्डांसह प्राइम ग्राहक ६ महिने मोफत स्क्रीन रिप्लेसमेंट आणि तीन महिन्यांच्या अतिरिक्त नो-कॉस्ट ईएमआयचा देखील लाभ घेऊ शकतात. Amazon मोबाईल सेव्हिंग डेज सेलमध्ये , Xiaomi, Samsung , Realme आणि इतर स्मार्टफोनवर १० टक्के सूट दिली जात आहे. Oppo F17 वर कूपनद्वारे २,००० रुपयांची सूट दिली जात आहे. वाचा: या सेलमध्ये OnePlus 9 ४५,९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत खरेदी करता येईल. यावर ४,००० रुपयांची सूट दिली जात आहे. यासाठी तुम्हाला मोबाईल खरेदी करताना ४,००० रुपयांचे कूपन लावावे लागेल, जे तुम्हाला प्रोडक्ट्सच्या तळाशी दिसेल. याशिवाय, तुम्ही बँक ऑफरसह ३००० रुपयांची अतिरिक्त सूट देखील घेऊ शकता. Mi 11X एक्सचेंज करताना अतिरिक्त ५००० रुपयांची सूट दिली जात आहे. Redmi Note 10 Series अनेक बँक ऑफरसह उपलब्ध आहेत. शाओमी स्मार्टफोनवर १८ महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट ईएमआय पर्याय दिला जात आहे. Samsung GalaxyM 21 2021 एडिशन, Samsung Galxy M 31आणि Galaxy M 32 खरेदीदार ६ महिन्यांच्या नो-कॉस्ट ईएमआय पर्यायाचा लाभ घेऊ शकतात. प्राइम ग्राहक अतिरिक्त ९ महिन्याच्या नो-कॉस्ट ईएमआय पर्यायाचा आणि ६ महिन्यांच्या मोफत स्क्रीन रिप्लेसमेंटचा लाभ घेऊ शकतात. Realme X7, iQoo 7 आणि iPhone XR वर देखील १० टक्के सूट दिली जात आहे. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3xT4CMn