नवी दिल्लीः Xiaomi लवकरच भारतात आपला पॉप्युलर स्मार्टफोन चा नवीन कलर व्हेरियंट Starlight Purple लाँच करणार आहे. कंपनीने या नवीन व्हेरियंटचा टीझर आपल्या ट्विटर अकाउंटवरून शेयर केला आहे. कंपनीने नवीन कलर व्हेरियंटला मागील महिन्यात मलेशियात लाँच केले होते. फोनचे नवीन कलर व्हेरियंट ८ जीबी रॅम आणि १२८ जीबीचे इंटरनल स्टोरेज दिले आहे. वाचा: कंपनीने मलेशियात रेडमी नोट 10S चा स्टारलाइट पर्पल व्हेरियंटला ३० जुलै रोजी लाँच केले होते. याची किंमत MYR 899 जवळपास १५ हजार ७०० रुपये आहे. फोनला कंपनीने ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी इंटरनल स्टोरेज सोबत लाँच केले होते. त्यामुळे असे मानले जात आहे की, हा फोन याच रॅम आणि स्टोरेज सोबत येईल. रेडमी नोट 10S ला कंपनीने भारतात १३ मे रोजी लाँच केले होते. लाँच वेळी या फोनला तीन कलर व्हेरियंट मध्ये डीप सी ब्लू, फ्रॉस्ट वाइट आणि शॅडो ब्लॅक कलर ऑप्शन मध्ये शेयर केले होते. कंपनी या फोनच्या स्टारलाइट पर्पल व्हेरियंटला भारतात कोणत्या दिवशी लाँच करणार आहे, यासंबंधी कंपनीकडून कोणतीही माहिती देण्यात आली नाही. वाचा: रेडमी नोट 10S चे फीचर आणि स्पेसिफिकेशन फोन मध्ये 1080x2400 पिक्सल रेजॉलूशन सोबत ६.४३ इंचाचा फुल एचडी प्लस अमोलेड डिस्प्ले दिला आहे. भारतात आता हा फओन ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेज व्हेरियंट मध्ये उपलब्ध आहे. प्रोसेसर म्हणून कंपनी यात मीडियाटेक हीलियो G95 SoC चिपसेट ऑफर करते. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये एलईडी फ्लॅश सोबत क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. वाचा: या फोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर सोबत एक ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर, एक २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि एक २ मेगापिक्सलचा मायक्रो सेन्सर दिला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये १३ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 5000mAh ची बॅटरी दिली आहे. जी ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट सोबत येते. वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3AQTSAa