नवी दिल्ली : दिग्गज टेक कंपनी अॅपलला टक्कर देण्यासाठी चीनी कंपन्या दररोज नवनवीन इनोव्हेशन करत आहे. एका रिपोर्टनुसार शाओमीचे नवीन फीचर अॅपलला टक्कर देऊ शकते. लाँच इव्हेंटमध्ये शाओमीने १२.५ इन्हांस्ट एडिशनला सादर केले आहे. यावेळी बोलताना कंपनीने सांगितले की, MIUI चे नवीन व्हर्जन कोणतेही नवीन फीचर देत नाही. केवळ ऑप्टिमाइजेशनवर फोक्स करते. मात्र, कंपनीने लपून छपून आयओएस सारखे व्हिजेट सिस्टमला सादर केले आहे. वाचाः चीनमध्ये एक iOS-इंस्पायर्ड व्हिजेट सिस्टमचे टेस्टिंग करत आहे. रिपोर्टनुसार, नवीन फीचर अॅप वॉल्ट (V५.०.५६) आणि MIUI गॅलरी (V२.२.२१) च्या लेटेस्ट बीटा व्हर्जनच्या माध्यमातून इनेब्लड होईल. सध्या अॅप्लिकेशनच्या या व्हर्जनला केवळ अँड्राइड ११ वर आधारित MIUI बीटा बिल्ड डिव्हाइसवरच इंस्टॉल करता येते. हे फीचर MIUI १२.५ एन्हांस्ट एडिशनचा भाग असल्याचे समजते. जे रेग्यूलर MIUI १२.५ बीटा सॉफ्टवेअरसह येणारे डिव्हाइस वापरत आहेत ते देखील याचा वापर करू शकतात. टेस्टिंग प्रोग्रामसाठी साइन अप करावे लागेल. हे रजिस्ट्रेशन २७ ऑगस्टला समाप्त होईल. यूजर्स आता होम स्क्रीनवर २×२, ४×२, ४×४ आणि २×३ आकाराचे व्हिजेट ठेवू शकता. एक नवीन व्हिजेट स्टोर जोडण्यात आलेले आहे. याचा उपयोग करून यूजर्स स्क्रीनवर व्हिजेटला मोठे करू शकता. नवीन फीचरचा उपयोग करण्यासाठी नवीन सिस्टम अॅप व्हिजेट सादर केले आहे. शाओमीनुसार, MIUI व्हिजेट सिस्टम १७ ऑगस्ट ते २० ऑक्टोबरपर्यंत टेस्टिंग फेजमध्ये असेल. त्यामुळे स्टेबल फीचरचा वापर करण्यासाठी सर्व यूजर्सला काही महिने वाट पाहावी लागेल. अॅपलकडून आयओएस १४ सादर केल्यानंतर पुन्हा एकदा व्हिजेट्स पाहायला मिळत आहे. गुगलने अँड्राइड १२ सोबत व्हिजेट सिस्टमला नवीन रुप दिले आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2XswudN