नवी दिल्लीः जर तुम्हाला नवीन फीचर फोन खरेदी करायचा असेल तर आता मार्केट मध्ये तुमच्यासाठी काही बेस्ट ऑप्शन आले आहेत. TPV टेक्नॉलजी ने मॅनुफैक्चरिंग पार्टनर Padget सोबत मिळून Philips ब्रँडचे नवीन फीचर फोन्सला लाँच केले आहे. फिलिप्सचे हे फीचर फोन E सीरीजचे आहेत. या अंतर्गत कंपनीने Xenium E209, Xenium E125 आणि Philips E102A फीचर हँडसेट्सला लाँच केले आहे. याची किंमत १३९९ रुपयांपासून २९९९ रुपयांपर्यंत आहे. फिलिप्स ब्रँडच्या या फीचर फोन्सला लीडिंग ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्स आणि ऑफलाइन स्टोरवरून खरेदी करू शकता. कंपनी या वर्षी अखेरपर्यंत आणखी तीन फीचर फोन सोबत पॉवर बँक्स, वॉल चार्जर व केबल सारखे अॅक्सेसरीज सुद्धा लाँच करण्याची तयारी करीत आहे. वाचाः Xenium E209 चे फीचर हा लाँच करण्यात आलेला सर्वात प्रीमियम हँडसेट आहे. २ हजार ९९९ रुपयांच्या किंमतीसोबत या फोनमध्ये २.४ इंचाचा डिस्प्ले दिला आहे. फोन SOS फंक्शन सोबत येतो. यात 108dB पर्यंत व्हॅल्यूमचे लाउडस्पीकर दिले आहे. 1000mAh ची बॅटरी दिली आहे. फोनमध्ये टॉर्च सोबत लॉक अनलॉकसाठी डेडिकेटेड बटन उपलब्ध आहे. SD कार्ड स्लॉटच्या या फोनमध्ये इन बिल्ट वायरलेस एफएस आणि कनेक्टिविटीसाठी ब्लूटूथ ३.० दिले आहे. वाचाः Xenium E125 चे फीचर फिलिप्सच्या या फिचर फोनची किंमत २ हजार ९९ रुपये आहे. फोनमध्ये १.७७ इंचाचाच डिस्प्ले दिला आहे. MT6261M SoC प्रोसेसर दिला असून या फोनमध्ये फोटोग्राफीसाठी QVGA कॅमेरा दिला आहे. या फोनमध्ये 2000mAh ची बॅटरी दिली आहे. कंपनीचा दावा आहे की, बॅटरी स्टँडबाय टाइम १५०० तासांपर्यंत चालते. ड्यूल सिम स्लॉटच्या या फोनमध्ये बिल्ट इन ब्लूटूथ ३.० आणि इन बिल्ट म्यूझिक प्लेयर सुद्धा दिले आहे. वाचाः फिलिप्स E102A चे फीचर या फीचर फोनची किंमत १३९९ रुपये आहे. फोनमध्ये 128x160 पिक्सल रेजॉलूशन सोबत १.७७ इंचाचा TFT डिस्प्ले दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 1000mAh ची बॅटरी दिली आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये कंपनीने बेसिक VGA कॅमेरा दिला आहे. एसडी कार्ड स्लॉट दिला आहे. फोनमध्ये म्यूझिक प्लेयर, वायरलेस एफएम, दमदार स्पीकर आणि गेम दिले आहे. कनेक्टिविटीसाठी यात तुम्हाला ब्लूटूथ २.१ सोबत ड्युअल सिम आणि एक GPRS ब्राउजर दिले आहे. वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3AK8ykb