Full Width(True/False)

Bell Bottom- कोणी दिला लारा दत्ताला इंदिरा गांधींचा लुक?

मुंबई: अभिनेता अक्षय कुमारची मुख्य भूमिका असलेला चित्रपट ''ची चर्चा मागच्या काही दिवसांपासून सातत्यानं सुरू आहे. खास करून या चित्रपटातील अभिनेत्री लारा दत्ताची भूमिका सर्वाधिक चर्चेत आहे. लारानं या चित्रपटात भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारत आहे. पण या चित्रपटातील लाराचा लुक पाहून सर्वच अवाक झाले आहेत. अनेकांनी तर या लुकच्या मेकअप आर्टिस्टला राष्ट्रीय पुरस्कार देण्याची मागणी केली. लारा दत्ताच्या या लुकची बरीच चर्चा झाली. पण या लुकसाठी बरीच मेहनतही घ्यावी लागली. लाराच्या या लुकचं संपूर्ण श्रेय प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट आणि त्यांच्या टीमला जातं. विक्रम गायकवाड हे बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट आहेत आणि त्यांनी त्यांच्या कामासाठी ४ वेळा राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाले आहे. बेल बॉटममधील लाराच्या लुकबद्दल एका हिंदी वेबसाइटशी बोलताना विक्रम गायकवाड म्हणाले, 'सध्या मी करोनामधून रिकव्हर होत आहे. त्यामुळे फार कोणाशी बोलणं झालेलं नाही. या लुकला लोकांचा मिळालेला प्रतिसाद पाहून खूप आनंद झाला. जेव्हा तुमच्या कामाचं कोणी कौतुक करतं तेव्हा खूप छान वाटतं.' लारा दत्ताच्या लुकबद्दल बोलताना विक्रम गायकवाड म्हणाले, 'जेव्हा माझ्याकडे इंदिरा गांधी यांच्यासारख्या आयकॉनिक पर्सनॅलिटीच्या लुकचा प्रस्ताव आला. तेव्हा मी आणि माझ्या टीमनं मोठ्या जबाबदारीसह हे आव्हान स्वीकारलं. अर्थात चेहऱ्याच्या भावांवरून हे साकारण्याची जबाबदारी मेकर्स आणि कलाकारांची असते. बेल बॉटम एक सत्य घटनेवर आधारित चित्रपट आहे. त्यामुळे कलाकार आणि त्यांचा लुक त्या काळातील व्हिज्युअलच्या हिशोबानं असायला हवा. आज प्रेक्षक जो लुक पाहत आहेत. त्यामागे प्रचंड मेहनत आणि अनेक मिटिंग्स, क्रिएटिव्ह डिस्कशन आहे. मी स्क्रिप्ट वाचली आणि कास्टिंग डायरेक्टरनं सांगितलं की, ही भूमिका साकारत आहे.' विक्रम गायकवाड पुढे म्हणाले, 'जर तुम्ही लारा दत्ता आणि इंदिरा गांधी यांच्या चेहऱ्याची तुलना केली तर त्यात कोणतंही साम्य दिसून येत नाही. पण लारा दत्तानं ही भूमिका उत्तम प्रकारे वठवली आहे. ती एक उत्तम अभिनेत्री आहे. त्यामुळे माझी जबाबदारी होती की, मला तिच्या लुकला पूर्ण न्याय देता यायला हवा. त्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागली. जेव्हा पहिल्यांदा लारानं स्वतःला आरशात पाहिलं तेव्हा 'मी स्वतःला शोधू शकत नाहीये' अशी तिची प्रतिक्रिया होती. ती माझ्या कामावर खुश होती. एवढंच नाही तर अक्षय आणि बाकी टीम देखील तिला ओळखू शकले नव्हते की ती खरंच लारा आहे.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3Ah00Bq