Full Width(True/False)

Motorola Edge S Pro स्मार्टफोन लाँच, १०८ MP कॅमेरा आणि हे जबरदस्त फीचर्स

नवी दिल्लीः मोटोरोला ने आपल्या Moto Edge सीरीजचे नवीन स्मार्टफोन ला लाँच केले आहे. या स्मार्टफोनला चार व्हेरियंट मध्ये ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज, ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज, ८ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेज आणि १२ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेज मध्ये लाँच केले आहे. कंपनीचा हा स्मार्टफोन सर्वात स्लीम आणि हलका वजनाचा ५जी स्मार्टफोन असल्याचे सांगितले जात आहे. कंपनीने या फोनला सध्या चीनमध्ये लाँच केले आहे. याची सुरुवातीची किंमत 2499 युआन म्हणजेच जवळपास २८ हजार ६६० रुपये आहे. चीनमध्ये कंपनीने या फोनची प्री-ऑर्डर सुरू केली आहे. याचा सेल १० ऑगस्ट पासून सुरू होणार आहे. वाचाः मोटोरोला एज S प्रोचे फीचर फोनमध्ये 144Hz च्या रिफ्रेश रेट सोबत ६.७ इंचाचा OLED डिस्प्ले दिला आहे. हा डिस्प्ले 576Hz टच सॅम्पिलिंग रेट आणि HDR10+ सपोर्ट सोबत येतो. या फोनला कंपनीने १२ जीबी पर्यंत LPDDR5 रॅम आणि २५६ जीबी पर्यंत UFS 3.1 स्टोरेज सोबत लाँच केले आहे. प्रोसेसर म्हणून स्नॅपड्रॅगन ८७० चिपसेट दिला आहे. वाचाः फोटोग्राफीसाठी फोनमध्ये एलईडी फ्लॅश सोबत ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात १०८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सोबत एक ८ मेगापिक्सलचा पेरिस्कोप कॅमेरा आणि एक १६ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा दिला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये कंपनीने ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा ऑफर केला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 4520mAh ची बॅटरी दिली आहे. जी ३० वॉटच्या टर्बोपॉवर चार्जिंग सोबत येते. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3fBg356