मुंबई- मराठी प्रेक्षकांच्या घराघरात स्थान मिळवणारी मालिका 'रात्रीस खेळ चाले' पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस पडलं. अण्णा, शेवंता, माई, पांडू, सुशल्या या सर्वच पात्रांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. बघता बघता मालिकेचे तीन सीजन प्रेक्षकांच्या भेटीला आले. परंतु, काही महिन्यांपूर्वी करोनाच्या दुसऱ्या लाटेत लावल्या गेलेल्या निर्बंधांमुळे अनेक मालिकांच्या चित्रीकरणावर निर्बंध आले. त्यात '' मालिकेचं चित्रीकरण देखील बंद करण्यात आलं. परंतु, आता मालिकेच्या चित्रीकरणाला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेत लागलेल्या निर्बंधांमुळे मालिकेचं चित्रीकरण थांबवण्यात आलं. इतर मालिकांनी चित्रीकरणासाठी परराज्यात जाण्याचा निर्णय घेतला. परंतु, 'रात्रीस खेळ चाले ३' मालिकेत दाखवण्यात येणारी कथा नाईक वाड्याभोवती फिरत असल्याने इतर ठिकाणी चित्रीकरण करणं निर्मात्यांसाठी शक्य झालं नाही. परंतु, आता पुन्हा एकदा निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे नाईकवाडा पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मालिकेचे नवे भाग पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. झी मराठीवर प्रचंड गाजलेली मालिका '' येत्या १५ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. 'देवमाणूस' मालिकेचा दोन तासांचा महाएपिसोड दाखवण्यात येणार आहे. तर १६ ऑगस्टपासून 'ती परत आलीये' ही नवी कोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'रात्रीस खेळ चाले ३' मालिका देखील १६ ऑगस्टपासून रात्री ११ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता मालिकेत कोणकोणते नवे ट्विस्ट दाखवण्यात येणार आणि पुढे कथा कशी रंगत जाणार हे पाहणं औसुक्याचं ठरणार आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3lF1zVC