Full Width(True/False)

घर गेलं म्हणून रुपाली भोसलेवर आलेली गोठ्यात राहायची वेळ

मुंबई- मनोरंजन क्षेत्रात येण्यासाठी कित्येक कलाकार धडपड करत असतात. काही कलाकारांना लगेच यश मिळतं तर काहींना बराच प्रवास करावा लागतो. परंतु, या कलाकारांना करावा लागणारा प्रवास प्रचंड खडतर असतो. छोट्या पडद्यावर गाजणाऱ्या '' मालिकेत नकारात्मक भूमिका साकारणारी अभिनेत्री हिला देखील असंख्य अडचणींना तोंड द्यावं लागलं. मनोरंजन क्षेत्रात येण्यापूर्वीचा रुपालीचा प्रवास प्रचंड कठीण होता. घराघरात रुपालीच्या भूमिकेला प्रेक्षक वाईट म्हणत असले तरी खऱ्या आयुष्यात मात्र रुपालीची लोकप्रियता प्रचंड आहे. ही लोकप्रियता मिळवण्यासाठी रुपालीने खूप मेहनतही घेतली आहे. अभिनेता स्वप्नील जोशी याचा रेडिओ कार्यक्रम 'शेअर विथ स्वप्नील' मध्ये रुपालीने तिची कहाणी सांगितली आहे. रुपालीने म्हटल्याप्रमाणे, तिच्या बालपणापासूनच त्यांच्या कुटुंबावर एकापाठोपाठ एक संकटं येत होती. मुंबईच्या बीडीडी चाळीत लहानाची मोठी झालेल्या रुपालीच्या वडिलांना तिच्या काकांनी एक स्कीम सांगितली. रुपालीच्या वडिलांनी त्यांच्याकडे असलेले सगळे पैसे काकांच्या हाती दिले. स्कीम खोटी असल्याने रुपालीच्या काकांना अटक झाली आणि रूपालीचं कुटुंब रस्त्यावर आलं. भर पावसात घरासाठी रुपालीचं कुटुंब रस्त्यात वणवण करत होतं. त्यांच्याकडे दोन वेळच्या जेवणाइतकेही पैसे नव्हते. रुपाली आणि तिचा भाऊ भिजू नये म्हणून रुपालीच्या आईने त्यांच्या डोक्यावर ताडपत्री धरली होती. याच परिस्थितीत रुपालीच्या आईला दोनदा हृदय विकाराचा झटका येऊन गेला. रुपालीने पुढे म्हटल्याप्रमाणे, 'रुपालीचं संपूर्ण कुटुंब रस्त्यावर दिवस काढत असताना तिच्या वडिलांच्या मित्राने त्यांना राहायला एक जुनी पत्र्याची खोली दिली. या ठिकाणी आधी गुरे बांधली जायची. मात्र रुपालीच्या कुटुंबावर गोठ्यात राहायची वेळ आली होती. या खोलीच्या भिंतींना मोठी छिद्र असल्याने रुपाली पहाटे तीन वाजता उठून अंघोळ करायची. अशा परिस्थितीत रुपालीच्या भावाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे घरची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेत रुपालीने शाळा सोडण्याचा निर्णय घेतला आणि काम करू लागली. आता लोकप्रियता आणि यश मिळवणाऱ्या रुपालीने तिच्या आयुष्यात अनेक संकटांना तोंड दिलं आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2U0QTFk