Full Width(True/False)

'जास्त खाऊ नकोस नाहीतर तुझ्यासोबत कुणी लग्न करणार नाही'

मुंबई- '' मालिकेने फार कमी वेळात प्रेक्षकांची मनं जिंकली. मालिकेतील स्वीटू आणि ओमची जोडी तर प्रेक्षकांची प्रचंड आवडती आहे. मालिकेत स्वीटूची भूमिका साकारणारी अभिनेत्री देखील प्रेक्षकांची आवडती आहे. परंतु, आपल्या जाड असण्यामुळे अन्विताला अनेकदा लोकांचे टोमणे ऐकावे लागले आहेत. बारीक असणं म्हणजे सुंदर असणं नसतं, असं अन्विताने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं आहे. आपल्या सुंदर अभिनयाच्या जोरावर सौंदर्याची परिभाषा बदलणारी अन्विता आज अनेक मुलींसाठी प्रेरणादायी ठरलीये. एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत अन्विता म्हणते, 'मला एवढी मोठी संधी मिळेल असा विचार मी स्वप्नातदेखील केला नव्हता. मी मालिकेत स्वीटूची भूमिका साकारतेय जी अनेकांना हे पटवून द्यायला यशस्वी ठरलीये की बारीक असणं म्हणजेच सुंदर असणं नसतं. मी खूप आनंदी आहे कारण मला अशी भूमिका साकारायला मिळतेय जशी मी खऱ्या आयुष्यात आहे. आपण अनेक फिट आणि सडपातळ मराठी अभिनेत्री पाहतो पण मी या सगळ्यात वेगळी ठरले आणि मुख्य भूमिकेतील अभिनेत्री ही बारीक हवी अशी संकल्पना मी मोडीत काढली. ही खूप मोठी जबाबदारी आहे आणि ती पार पाडण्यात मला मालिकेतील प्रत्येक पात्राची मदत होते.' लहानपणापासून आलेल्या अनुभवाबद्दल सांगताना अन्विता म्हणाली, 'मला लहानपणापासून माझ्या शरीरावरून खूप टोमणे मारले गेले. लोक मला जाडी म्हणायचे. जाडी हे तुमचं टोपणनाव असू शकत नाही. काही तर म्हणायचे, खूप खाऊ नकोस नाहीतर तुझ्यासोबत लग्न करायला कुणीही तयार होणार नाही. मला खूप वाईट वाटायचं. लोक माझ्याबद्दल खूप काही बोलायचे पण मी आता प्रेक्षकांची मनं जिंकली. मला प्रेक्षकांचा जो प्रतिसाद मिळतोय तो पाहून मी भारावून जाते आणि प्रेक्षकांचं हेच प्रेम मला पुढे काम करायला प्रेरणा देतं. लोकांना वाटतं अभिनय करणं खूप सोप्पं आहे पण तसं नाहीये. आपण जेव्हा त्या ठिकाणी उभे राहतो तेव्हा तिथलं वातावरण आपल्याला घाबरवून टाकणारं असतं. प्रत्येक क्षणाला नवीन काहीतरी शिकवणारं असतं.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3fEOw2A