Full Width(True/False)

रेडमीचे ग्राहकांना गिफ्ट, या स्मार्टफोन्ससाठी जारी केले अपडेट; मिळणार नवीन फीचर

नवी दिल्ली : ने आपल्या सीरिजच्या स्मार्टफोन्ससाठी लेटेस्ट १२.५ अपडेट जारी केले आहे. नवीन MIUI १२.५ अपडेट अँड्राइड ११ वर आधारित आहे. हे अपडेट , आणि स्मार्टफोन्ससाठी जारी करण्यात आले आहे. MIUI १२.५ अपडेटसोबतच शाओमीने या डिव्हाइजसाठी सिक्योरिटी पॅच देखील जारी केले होते. काही दिवसांपूर्वीच कंपनी नोट ९ साठी MIUI १२.५ जारी केले होते. वाचाः नवीन MIUI १२.५ अपडेटसह रेडमी ९ सीरिजच्या या स्मार्टफोन्समध्ये अनेक नवीन फीचर्स मिळत आहे. रेडमी ८ मध्ये अपडेटचे व्हर्जन V12.5.10.QCNINXM आहे, रेडमी ८ए मध्ये फर्मवेअर व्हर्जन V12.5.1.0.QCPINXM आणि रेडमी ९ ए ड्यूलमध्ये V12.5.1.0.QCQINXM अपडेट देण्यात आले आहे. एमआययूआय १२.५ अपडेटसोबत फोन्समध्ये Notes App ला नवीन डिझाइन मिळाले आहे. डूडलिंग आणि स्केचिंगसाठी नवीन टूल्स देण्यात आले आहे. याशिवाय मायक्रोफोन आणि कॅमेऱ्यासाठी वन-टाइम परमिशन, स्मार्ट डिव्हाइस कंट्रोल, चॅट बबल्स व क्लिपबोर्ड अ‍ॅक्सिस अलर्ट सारखे फीचर्स या फोन्समध्ये मिळतील. नवीन अपडेटमध्ये चेंजलॉगमध्ये जे नवीन फीचर्स देण्यात आले आहे, त्यात जेस्चर रिस्पॉन्स आता इंस्टंट आहे. एमआययूआ आधीपेक्षा लाइट, फास्ट आणि ड्यूरेबल आहे. तसेच, रेंडरिंग पॉवर आधीपेक्षा २० पटींनी वाढली आहे. जुलैमध्ये जारी केलेल्या अँड्राइड सिक्योरिटी पॅचसह सिस्टम सिक्योरिटी आधीपेक्षा चांगली झाली आहे. डूडलिंक आणि स्केचिंगसाठी नवीन टूल्स दिले आहेत. स्ट्रोक्सला ऑटोमॅटिकल एडजस्ट करण्यासाठी प्रेस आणि होल्ड करावे लागेल. आता जेस्चर शॉर्टकटसह नोट्स आणि टास्क क्रिएट करता येईल. रेडमी ८, रेडमी ८ए आणि रेडमी ८ए ड्यूलमध्ये अपडेट वेगवेगळ्या फेजमध्ये जारी केले जात आहे. तुम्ही सेटिंग्समध्ये सॉफ्टवेअर अपडेटमध्ये जाऊन नवीन अपडेट आले आहे की नाही हे तपासू शकता. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3fFCg1E