नवी दिल्लीः कॉल करताना किंवा म्यूझिक ऐकण्यासाठी तुम्ही हेडफोन किंवा ब्लूटूथ ईयरफोनचा वापर करीत असाल तर तुम्हाला आता अलर्ट होण्याची गरज आहे. कारण, राजस्थानमधील जयपूर जिल्ह्यात एक अशीच दुर्घटना समोर आली आहे. चार्ज करताना ब्लूटूथ हेडफोचा स्फोट झाल्याने एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. पोलिसांनी शनिवारी सकाळी सांगितले की, या दुर्घटनेत २८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. तो स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होता. ही दुर्घटना चौमू येथील उदयपुरिया गावात घडली आहे. या स्फोटानंतर तरुणाला हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले परंतु, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. वाचाः हॉस्पिटल मध्ये घेतला अखेरचा श्वास राकेश कुमार असं या तरुणाचं नाव आहे. घरात ब्लूटूथ हेडफोन लावून बसला होता. त्याला चार्ज करणारे प्लगला जोडले होते. गोविंदगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अचानक हेडफोनमध्ये स्फोट झाला त्यात तरुणाला गंभीर दुखापत झाली. या स्फोटानंतर या तरुणाला हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले परंतु, उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. वाचाः फेब्रुवारीत झाले होते लग्न सिद्धिविनायक हॉस्पिटलचे डॉ. एल. एन. रुडला यांनी सांगितले की, तरुणाला गंभीर दुखापतीत हॉस्पिटल मध्ये आणले गेले होते. हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. डॉक्टरने दिलेल्या माहितीनुसार, हार्ट अटॅक आल्याने तरुणाचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी सांगितले की, या वर्षी फेब्रुवारी मध्ये या तरुणाचे लग्न झाले होते. अभ्यासात हा तरुणा हुशार होता. तसेच तो स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होता, असे मृत्यू झालेल्या तरुणाच्या कुटुंबीयांनी सांगितले. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3fFCR3o