Full Width(True/False)

सेकंड हँड स्मार्टफोन खरेदी करताना ही सावधानता बाळगा, पाहा या खास टिप्स

नवी दिल्लीः Second hand Smartphone: मार्केटमध्ये वेगवेगळ्या किंमतीचे स्मार्टफोन उपलब्ध आहेत. स्वस्तातील स्वस्त आणि महाग किंमतीचे स्मार्टफोन या ठिकाणी मिळत असतात. ऑनलाइन शॉपिंगच्या काळात आता स्मार्टफोन खरेदी करताना अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे अनेक जण सेकंड हँड फोन खरेदी करताना दिसत आहेत. अनेकदा आपल्या पसंतीचा फोन किंमत जास्त असल्याने खरेदी करता येत नाही. जर तुम्हाला महागडा स्मार्टफोन स्वस्त किंमतीत खरेदी करायचा असेल तर तुम्ही सेकंड हँड फोन खरेदी करू शकता. सेकंड हँड फोन खरेदी करणे वाईट नाही. परंतु, खरेदी करताना काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. वाचा: समोरासमोर येवून चर्चा करा जर तुम्ही कोणत्याही वेबसाइटवरून सेकंड हँड फोन खरेदी करीत असाल तर फोन विकणाऱ्या व्यक्तीसोबत एक मीटिंग व्हायला हवी. तुमचा हा प्रयत्न असायला हवा की, डील समोरासमोर बसून व्हायला हवा. त्यामुळे फ्रॉडची शक्यता खूपच कमी असते. फोन वापरून जरूर पाहा सेकंड हँड स्मार्टफोन खरेदी करताना फोनला आपल्या हातात घेवून तो व्यवस्थित चालतोय ना याची खात्री करून घ्या. कमीत कमी १५ मिनिटांपर्यंत फोनचा वापर करून पाहा. यावरून तुम्हाला फोनचा परफॉर्मन्स, बॅटरी क्षमता आणि फोन ठीक चालतोय की नाही याची माहिती होईल. फोनचे पार्ट्स चेक करा सेकंड हँड फोन ज्यावेळी खरेदी करता त्यावेळी त्याचे पार्ट्स जरूर चेक करा. कारण, नंतर कोणतेही पार्ट्स खराब निघता कामा नये. सेकंड हँड फोनचा लूक पाहून फोन खरेदी करू नका. या गोष्टीवर लक्ष द्या सेकंड हँड स्मार्टफोन खरेदी करताना त्याचा रिटेल बॉक्स जरूर घ्या. फोनच्या उपलब्ध बिल सोबत आयएमआय नंबर मिळून पाहा. IMEI नंबर चेक करण्यासाठी फोनमध्ये *#06# डायल करा. समोर स्क्रीनवर नंबर येईल. जर फोन विकणारा म्हणत असेल फोन बिल हरवले आहे तर त्याच्याकडून हे लिहून घ्या. व्हर्च्युअल पेमेंट कधीच करू नका सेकंड हँड स्मार्टफोन खरेदी करताना व्हर्च्युअल किंवा ऑनलाइन पेमेंट कधीच करू नका. फोन जोपर्यंत तुमच्या हातात येत नाही. तोपर्यंत पेमेंट करू नका. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3gd0Hnq