Full Width(True/False)

भारतातील या ६ पॉप्युलर 'देसी अॅप्स'ला जरूर ट्राय करा, जाणून घ्या डिटेल्स

नवी दिल्लीः अॅप बनवण्यात आता भारतीय डेव्हलपर्स सुद्धा मागे नाहीत. अनेक देसी अॅप्स खूप प्रसिद्ध झाले आहेत. यात कू पासून लूडो किंग पर्यंतचा समावेश आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच भारतातील सहा पॉप्यूलर देसी अॅप्स विषयीची माहिती सांगणार आहोत. जाणून घ्या डिटेल्स. वाचाः Koo Koo एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. याला मायक्रो ब्लॉगिंग साइट ट्विटरचा अल्टरनेटिव मानले जात आहे. याची लोकप्रियता गेल्या काही दिवसांपासून खूप वेगाने वाढत आहे. हे अॅप डिजिटल इंडिया आत्मनिर्भर भारत इनोवेट चँलेंजचे विनर सुद्धा राहिलेले आहे. याला तुम्ही फ्री मध्ये डाउनलोड करू शकता. ShareChat ShareChat एक प्रादेशिक सोशल नेटवर्क आहे. यावर युजर्स आपले विचार, लाइव रेकॉर्ड आणि नवीन मित्र बनवू शकतात. याला अनेक भाषेत उपलब्ध करण्यात आले आहे. यावर १८० मिलियनहून जास्त रजिस्टर्ड युजर्स आहेत. हे १५ भारतीय भाषेत उपलब्ध आहे. Chingari टिकटॉकवर भारतात बंदी घातल्यानंतर आलेल्या अनेक डेव्हलपर्सने याच्या अल्टरनेटिवला डेव्हलप केले आहे. Chingari अॅप त्यापैकीच एक आहे. या अॅपला खूप आधी बनवण्यात आले होते. पंरतु, याची लोकप्रियता टिकटॉकच्या बंदीनंतर वाढली आहे. या अॅपला गुगल प्ले स्टोर किंवा अॅपल अॅप स्टोरवरून डाउनलोड करू शकता. Moj चिंगारी शिवाय, Moj खूप लोकप्रिय भारतीय शॉर्ट व्हिडिओ बेस्ड अॅप आहे. या अॅपला लाखो लोकांनी डाउनलोड केलेले आहे. याला अनेक भारतीय भाषेत उपलब्ध करण्यात आले आहे. याला युजर्स गुगल प्ले स्टोरवरून डाउनलोड करू शकतात. FAU-G पबजी मोबाइलवर भारतात बंदी घातल्यानंतर FAU-G ची घोषणा करण्यात आली होती. याची भारतात जोरदार चर्चा झाली होती. आता या गेमला उपलब्ध करण्यात आले आहे. भारतात बनवण्यात आलेल्या या गेमचा प्रचार बॉलिवूडचा अभिनेता अक्षय कुमारने केला होता. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3k0eb7c