मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक झाल्यापासून सोशल मीडियावर शिल्पाच्या नावाची सातत्यानं चर्चा आहे. राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पालाही पोलिसांच्या प्रश्नांना समोरं जावं लागलं आहे. पण याशिवाय तिला सोशल मीडियावर सातत्यानं ट्रोल केलं गेलं आहे. याबाबत नुकतंच दिग्दर्शक हंसल मेहता यांनी एक ट्वीट केलं होतं. ज्यात त्यांनी शिल्पा शेट्टीला पाठिंबा दिला होता. त्यानंतर आता अभिनेत्री रिचा चढ्ढानं देखील शिल्पाला पाठिंबा देणारं ट्वीट केलं आहे. अभिनेत्री रिचा चढ्ढानं तिच्या ट्वीटमध्ये 'पुरुषांच्या चुकांसाठी स्त्रियांना दोष देणं बंद करा' असं म्हटलं आहे. रिचा चढ्ढानं आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं, 'हा आमचा राष्ट्रीय खेळ झाला आहे. जेव्हा जेव्हा कोणत्याही पुरुषाची काही चूक असते तेव्हा त्यासाठी त्याला दोष द्यायचं सोडून सर्वजण त्याच्या आयुष्यात असलेल्या स्त्रीला यासाठी जबाबदार मानायला सुरुवात करतात. अशा लोकांच्या विरोधात शिल्पानं केस केली आहे हे समजल्यावर आनंद झाला.' ट्विटर लिंक- दरम्यान मुंबई पोलिसांची क्राइम ब्रांच या केसमध्ये शिल्पा शेट्टीचा किती सहभाग होता याचा सर्वतोपरी तपास करत आहे. अर्थात शिल्पाच्या विरोधात त्यांना अद्याप पर्यंत कोणत्याही प्रकारचे ठोस पुरावे सापडलेले नाहीत. पण बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक हंसल मेहता यांनी मात्र या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया देत शिल्पा शेट्टीला आपला पाठिंबा दिला आहे. 'जर शिल्पाला साथ देता येत नसेल तर मग तिला एकटं सोडा. सध्या तिला तिची प्रायव्हसी मिळण्याची सर्वाधिक गरज आहे.' असं त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. ट्विटर लिंक- ट्विटर लिंक- ट्विटर लिंक- शिल्पा शेट्टीनं काही दिवसांपूर्वीच मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत वेगवेगळ्या मीडिया हाऊस आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पती राज कुंद्राच्या अटकेनंतर खोट्या आणि चुकीच्या बातम्या दिल्याबाबत मानहानीची केस दाखल केली आहे. यासोबत २५ लाख रुपयांची नुकसान भरपाई देखील तिनं मागितली आहे. दरम्यानं मुंबई पोलिसांनी शिल्पा शेट्टीला अद्याप पॉर्नोग्राफी केसमध्ये क्लिन चीट दिलेली नाही.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3flG7km