मुंबई- लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री गेले अनेक दिवस सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. शिल्पाचा पती आणि उद्योजक याला अश्लील व्हिडीओ बनवून ते प्रदर्शित केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. १९ जुलैपासून राजला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पतीला अटक झाल्यापासून शिल्पादेखील चाहत्यांमध्ये चर्चेत आहे. राजनंतर मुंबई पोलिसांकडून शिल्पाच्या या प्रकरणातील संबंधांची देखील चौकशी करण्यात येत आहे. याच दरम्यान, राजला अटक झाल्यानंतर शिल्पाने '' च्या चित्रीकरणासाठी येण्यास नकार दिला होता. परंतु, यामुळे शिल्पाला कोट्यवधींचं नुकसान झालं आहे. राजला अटक होण्यापूर्वी शिल्पा 'सुपर डान्सर ४' या कार्यक्रमात मुख्य परीक्षकाची जबाबदारी सांभाळत होती. परंतु, गेले काही आठवडे शिल्पा चित्रीकरणासाठी गैरहजर राहत आहे. शिल्पाच्या जागी दुसऱ्या अभिनेत्रीला परीक्षकाच्या खुर्चीत बसवलं जाण्याची चर्चादेखील सोशल मीडियावर रंगली होती. परंतु, कार्यक्रमाच्या निर्मात्यांनी शिल्पाची जागा कोणीही घेणार नसल्याचं स्पष्ट केलं. परंतु, कार्यक्रमात हजेरी न लावल्याने शिल्पाला नुकसान सहन करावं लागत आहे. कार्यक्रमाच्या एका आठवड्याच्या चित्रीकरणासाठी शिल्पा तब्बल १८ ते २२ लाख रुपये मानधन घेत होती. शिल्पा आठवड्यातून दोन दिवस कार्यक्रमात दिसत होती. त्यानुसार गेले काही आठवडे चित्रीकरण न केल्याने शिल्पाला नुकसान झालं आहे. आतापर्यंत चित्रीकरणामुळे शिल्पाला २ कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. हा आकडा पुढे वाढण्याचीही शक्यता आहे. यादरम्यान, शिल्पाने न्यायालयात मीडियाविरोधात मानहानीची तक्रार दाखल केली होती. परंतु, सत्य घटनांची माहिती देणं म्हणजे तुमची समाजातील प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करणं होत नाही, असं म्हणत न्यायालयाने सुनावलं. 'हंगामा २' या चित्रपटातून शिल्पाने १४ वर्षानंतर चित्रपटात पुन्हा पदार्पण केलं आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3zXAWPD