नवी दिल्ली : आणि भारतात १७ ऑगस्टला लाँच होणार आहे. लाँचिंगच्या आधी या दोन्ही स्मार्टफोन्सची किंमत लीक झाली आहे. Edge 20 Fusion ची सुरुवाती किंमत २१ हजार रुपये असू शकते. तर Edge 20 ची सुरुवाती किंमत ३० हजार रुपयांच्या आत असू शकते. वाचाः Motorola Edge 20 सीरिजला गेल्या महिन्यात यूरोपियन बाजारात लाँच करण्यात आले होते. या अंतर्गत Motorola Edge 20, Motorola Edge 20 Pro आणि Motorola Edge 20 Lite या मॉडेल्सला लाँच केले होते. अपकमिंग Motorola Edge 20 Fusion हे , Motorola Edge 20 Lite चे ट्विक्ड व्हर्जन असेल. टिप्स्टर देबयान रॉयने ट्वीट करत माहिती दिली आहे की, Motorola Edge 20 Fusion ला ६ जीबी+१२८ जीबी आणि ८ जीबी + १२८ जीबी व्हेरिएंटमध्ये सादर केले जाईल. ६ जीबी व्हेरिएंटची किंमत २१,४९९ रुपये आणि ८ जीबी व्हेरिएंटची किंमत २३,९९९ रुपये असेल. Motorola Edge 20 ला ८ जीबी + १२८ जीबी व्हेरिएंटमध्ये सादर केले जाईल. याची किंमत २९,९९९ रुपये असू शकते. कंपनीने मात्र अद्याप अधिकृतरित्या किंमतीचा खुलासा केलेला नाही. एक डेडिकेटेड पेजवर Motorola Edge 20 Fusion च्या काही स्पेसिफिकेशन्सची माहिती देण्यात आली आहे. फोनमध्ये ९० हर्ट्ज रिफ्रेश रेटसह १०-बिट एमोलेड डिस्प्ले मिळेल. सोबतच, MediaTek Dimensity ८००U प्रोसेसर आणि ट्रिपल रियर कॅमरा सेटअप मिळेल. Motorola Edge 20 Fusion मध्ये १०८ मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल आणि एक डेप्थ सेंसर मिळेल. सेल्फीसाठी ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. फ्लिपकार्ट पेजवर माहिती देण्यात आली आहे की, हा फोन निअर स्टॉक अँड्राइड ११ वर काम करेल. यामध्ये ThinkShield सोबत बिझनेस-ग्रेड सिक्योरिटी देखील मिळेल. भारतात Motorola Edge 20 13 5G सपोर्टसह येईल. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3AFSj7M