मुंबई : ख्यातनाम रॅप गायक यो यो ची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. हनीने आपल्यावर शारीरिक अत्याचार, लैंगिक शोषण, मानसिक अत्याचार आणि आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप त्याच्या बायकोने शालिनी तलवारने केले आहेत. इतकेच नाही तर त्याच्या आणि त्याच्या कुटुंबियांविरोधात गुन्हा ही दाखल केला आहे. याप्रकरणी आता हनी सिंगने त्याची बाजू सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत मांडली आहे. काय म्हणाला हनी सिंग हनी सिंगने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एका पोस्ट शेअर करत त्याची बाजू मांडली आहे. त्याने लिहिले आहे, ' २० वर्षांपासून मी माझी बायको, शालिनीसोबत आहे. शालिनी तलवारने माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर जे काही आरोप लावले आहेत ते सपशेल खोटे आहेत. तसेच तिने जे माझ्यावर आरोप केले आहेत, त्यामुळे मी खूपच व्यथित झालो आहे. हे आरोप अतिशय गंभीर आणि दुःखद आहेत.' हनी सिंगने त्याच्या निवेदनात पुढे नमूद केले आहे की, 'माझ्या गाण्यांवर होणारी समीक्षा, माझ्या तब्येतीबाबत नकारात्मक बातम्या येऊनही मी कधीही जाहीर निवेदन दिलेले नाही. परंतु याप्रकरणी गप्प बसणे योग्य नाही असे मला वाटले. कारण हे आरोप माझ्याबरोबरच माझे कुटुंब, माझे वृद्ध आईवडिल आणि लहान बहिणीवर करण्यात आले आहे. ते नेहमीच माझ्या कठीण काळात सोबत होते. माझ्यावर केलेले सर्व आरोप हे खोटे, माझी बदनामी करणारे आहेत...' हनी सिंगने पुढे लिहिले, ' मी १५ वर्षांहून अधिक काळ या इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे. देशातील अनेक कलाकार आणि संगीतकारांसोबत काम केले आहे. बायकोसोबत माझे संबंध कसे आहेत, याची माहिती माझ्यासोबत दहा वर्षांहून अधिक काळ काम करणा-या सर्वांना माहिती आहेत. ती माझ्यासोबत चित्रीकरण, कार्यक्रम आणि मिटिंगना यायची.' हनीने त्याच्या निवेदनात पुढे लिहिले आहे की, 'तिने केलेले सर्व आरोप मी फेटाळून लावत आहे. यापुढे त्यावर काहीच प्रतिक्रिया देणार नाही, कारण हे प्रकरण आता कोर्टात आहे. मला देशातील न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे आणि लवकरच सत्य बाहेर येईल. माझ्यावर जे आरोप लावले आहेत त्याचे उत्तर देण्यासाठी कोर्टाने मला संधी दिली आहे. दरम्यान, मी माझ्या सर्व चाहत्यांना आणि नागरिकांना विनंती करतो की माझ्या कुटुंबाबात कोणतीही प्रतिक्रिया देऊ नका. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर कोर्ट त्यांचा निर्णय देईल. मला विश्वास आहे की, मला न्याय मिळेल आणि सत्याचा विजय होईल...' हनी सिंगने त्याच्या निवेदनाच्या शेवटी नमूद केले आहे की, ' अधिनियमा'अंतर्गंत दिल्लीतील तीस हजारी कोर्टामध्ये याचिका दाखलकेली आहे. शालिनी तलवारने केलेल्या याचिकेवर कोर्टाने हनी सिंगच्या विरोधात एक नोटीस जारी केली आहे. त्यामध्ये याप्रकरणी त्याला २८ ऑगस्टपर्यंत उत्तर देण्यास सांगितले आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3jrIJyu