Full Width(True/False)

FACT CHECK: केजरीवालांनी दिल्लीत खरचं डिझेलच्या दरात ८.३६ रुपये कपात केली? जाणून घ्या सत्य

दावा दिल्लीचे मुख्यमंत्री यांनी राजधानीत दिल्लीत डिझेलच्या दरात प्रती लिटर ८.३६ रुपये कपात केली असल्याचा दावा केला जात आहे. एबीपी न्यूजचे ग्राफिक कार्ड शेअर करत हा दावा केला जात आहे. याशिवाय दिल्लीत सध्या डिझेलची प्रती लिटर ७३.६४ रुपये दरान विक्री केली जात असल्याचे यात म्हटले जात आहे. या ग्राफिक कार्डवर एपीबी न्यूजचा लोगो दिसत आहे व यावर खालच्या बाजूला उजव्या कोपऱ्यात ३० जुलै तारीख दिसत आहे. ‘BREAKING NEWS’ लिहिलेला हा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सत्य काय आहे ? हे ग्राफिक कार्ड एक वर्ष जुनं आहे. ३० जुलै २०२० ला सरकारने डिझेलच्या दरात प्रती लीटर ८.३६ रुपये कपात करून ८२ वरून ७३.६४ रुपये किंमत केली होती. सध्या दिल्लीतील डिझेलची किंमत जवळपास प्रती लिटर ८९.८७ रुपये आहे. कशी केली पडताळणी ? योग्य कीवर्ड वापरून आम्ही सर्च इंजिनच्या मदतीने केजरीवाल यांनी दिल्लीत डिझेलच्या किंमती कमी केलेली माहिती देणारी न्यूज शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, आम्हाला अशी कोणतीही माहिती मिळाली नाही. गुगलवर फिल्टर सर्चचा वापर करून आम्हाला आढळले की, केजरीवाल सरकारने गेल्यावर्षी ३० जुलैला डिझेलची किंमत प्रती लीटर ८.३६ रुपयांनी कमी केली होती. दिल्ली सरकारने ३० जुलै २०२० ला डिझेलवरील व्हॅट ३० टक्क्यांवरून १६.७५ टक्के करण्याचा निर्णय घेतला होता. कॅबिनेट मिटिंगनंतर केजरीवाल यांनी हा निर्णय घेतला होता. व्हॅटमध्ये कपात केल्याने डिझेलची किंमत प्रती लीटर ७३.६४ रुपयांपर्यंत खाली आली होती. ABP News ने आपल्या अधिकृत युट्यूब चॅनेलवर ३० जुलै २०२० ला याचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओचे शीर्षक ‘Delhi: Diesel Price Slashed By Rs 8.36 Per Litre: CM Arvind Kejriwal | Full PC | ABP News’ असे असून, ३० जुलै २०२० ला पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओत २.४१ मिनिटाल व्हायरल होत असलेले समान ग्राफिक दिसून येते. याशिवाय आम्ही दिल्लीतील सध्याची डिझेलची किंमत देखील तपासली, जी ८९.८७ रुपये प्रती लिटर आहे, ७३.६४ रुपये प्रती लीटर नाही. निष्कर्ष मटा फॅक्ट चेक पडताळणीत आढळले की जुने ग्राफिक कार्ड लोकांची दिशाभूल करण्यासाठी शेअर केले जात आहे. या फोटोमध्ये केजरीवाल यांनी आता डिझेलची किंमत ८.३६ रुपये प्रती लीटर कमी केल्याचा दावा केला जात आहे, जो चुकीचा आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3s1IUEM