Full Width(True/False)

सावधान! 'हे' अ‍ॅप वापरत असाल तर बंद होईल तुमचे व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट

नवी दिल्ली : इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप वापरणाऱ्यांची संख्या कोट्यावधीच्या घरात आहे. या अ‍ॅपवरून आपण अनेक काम सहज करू शकतो. मात्र, काही थर्ड पार्टी अ‍ॅपचा वापर केल्यास तुमचे बंद होऊ शकते. तुम्ही या अ‍ॅपचा वापर करत असाल तर तुमचे लवकरच बंद होईल. व्हॉट्सअ‍ॅप यूजर्ससाठी एकापेक्षा एक नवीन फीचर आणत असते. असे असले तरी अनेक फीचर्स यात मिळत नाहीत, जे याच्या प्रतिस्पर्धी अ‍ॅपमध्ये मिळतात. यामध्ये ऑटो-रिप्लाय, शेड्यूल चॅटचा समावेश आहे. वाचा: रिपोर्टनुसार, काही डेव्हलपर्स या फीचर्सचा समावेश करून व्हॉट्सअॅपचे अनाधिकृत व्हर्जन बनवत आहे. हे अॅप यूजर्सला आवडत असून, अधिकृत व्हॉट्सअॅपवरील चॅट या अॅपमध्ये ट्रांसफर करण्यास सांगितले जात आहे. मात्र, हे अनाधिकृत अॅप आहे. असेच एक अॅप आहे . व्हॉट्सअॅप यूजर्सला आपल्या अकाउंटवर या अतिरिक्त फीचर्सची गरज भासत असते. मात्र ऑफिशियल अॅपवर हे फीचर्स मिळत नसल्याने यूजर्स थर्ड पार्टी अॅप्सचा उपयोग करतात. व्हॉट्सअॅप अशा अकाउंट्सला थेट बॅन करत असते. केवळ व्हॉट्सअॅप प्लसच नाही, तर अशाप्रकारचे इतर थर्ड पार्टी अॅप्स वापरणाऱ्या अकाउंट्सवर देखील बंदी घातली जाते. अनेक थर्ड पार्टी अॅपद्वारे तुमच्या स्मार्टफोनमध्ये व्हायरसचा शिरकाव होऊ शकतो. यामुळे तुमची खासगी माहिती धोक्यात येऊ शकते. याशिवाय हे अॅप गुगल प्ले स्टोरवर डाउनलोडसाठी उपलब्ध नसतात. अशा अॅप्सला इतर वेबसाइटवरून डाउनलोड करावे लागते. तसेच, व्हॉट्सअॅपचे अधिकृत व्हर्जन वापरल्याने एंड-टू-एंड एन्क्रिप्शन सुविधा देखील यूजर्सला मिळते. यामुळे यूजर्सचे चॅट सुरक्षित व गोपनीय राहते. इतर अॅप्समुळे खासगी चॅट लीक होण्याचा देखील धोका असतो. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3k3xzQY