Full Width(True/False)

Tinder App वर अकाउंट ओपन करण्यासाठी द्यावी लागतील हे डॉक्यूमेंट, पाहा काय झाला नवीन बदल

नवी दिल्लीः जर तुम्ही सिंगल आहात आणि तुम्ही डेटिंग अॅप टिंडर () वर पार्टनर शोधत आहात. तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. टिंडर आता आपल्या युजर्संसाठी नियमात नवीन बदल करीत आहे. आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी त्या नियमांचे आणि त्यात काय फरक पडतो, यासंबंधीची माहिती देत आहोत, जाणून घ्या. वाचा: पुढच्या तिमाहीत रोलआउट होवू शकते फीचर टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, टिंडर (Tinder App) ने जगभरातील युजर्ससाठी आयडी व्हेरिफिकेशन फीचर जारी करण्याची घोषणा केली आहे. आगामी तिमाहीत हे फीचर रोलआउट केले जावू शकते. कंपनीच्या म्हणण्यानुसार, तज्ज्ञांच्या सल्ल्यानंतर हे पाऊल उचलले आहे. अॅपवर फेक लोकांना आळा बसेल टिंडर (Tinder App)च्या म्हणण्यानुसार, युजर्संना आता आयडी बनवण्यासाठी कोणतेही एक सरकारी डॉक्यूमेंट्स या अॅपवर अपलोड करावे लागणार आहे. यामुळे फेक नावाने आयडी बनवणाऱ्यांना आणि कमी वय सांगणाऱ्या लोकांना आळा बसेल. ऐच्छिक असतील नवीन बदल रिपोर्टच्या माहितीनुसार, टिंडर डेटिंग अॅप (Tinder App) वर आपले कोणतेही सरकारी डॉक्युमेंट अपलोड करणे हे ऐच्छिक असेल. म्हणजेच युजर्संना बंधनकारक नाही. परंतु, जे लोक आपली आयडी अपलोड करतील त्यावरून हे स्पष्ट होईल की, ते फेक नाहीत. त्यामुळे त्यांना मनासारखा पार्टनर मिळू शकतो. या देशात लागू झाला आहे बदल टिंडर अॅप (Tinder App) ने यासारखा प्रयोग २०१९ मध्ये जपानमध्ये केलेला आहे. या ठिकाणी कंपनीला चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्या ठिकाणी कंपनीने युजर्सचे वय हे १८ वर्षापेक्षा जास्त असणे बंधनकारक आहे. त्यासाठी ड्रायविंग लायसन्स, पासपोर्ट किंवा सरकारकडून जारी करण्यात आलेले कोणतेही हेल्थ कार्ड या अॅपवर अपलोड करणे बंधनकारक आहे. टिंडरला या अॅपची मिळतेय टक्कर डेटिंग अॅप टिंडर Tinder App) ला Bumble अॅपकडून जोरदार टक्कर मिळत आहे. Bumble अॅपला व्हिटनी वोल्फ हेर्डने बनवले आहे. हे अॅप खास करून महिलांसाठी बनवले गेले आहे. म्हणजेच या अॅपवरून महिला ठरवतात की त्यांना कोणासोबत डेटवर जायचे आहे. त्यामुळेच आता टिंडर सुद्धा स्वतःला यूजर्स फ्रेंडली सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2W53bxh