नवी दिल्ली : अॅमेझॉनवर Independence Day सेल समाप्त झाला असला तरीही अनेक होम अप्लायंसेज, स्मार्टफोन्सवर मोठी सूट दिली जात आहे. तुम्ही जर एअर कंडिशनर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर चांगली संधी आहे. याशिवाय स्मार्ट टीव्हीवर देखील बँक ऑफर्स आणि नो-कॉस्ट ईएमआयचा पर्याय मिळत आहे. २० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळणाऱ्या एसी आणि स्मार्ट टीव्हीविषयी जाणून घेऊया. वाचा: 1.0 Ton 3 Star Window (GLW12B32WSEW, White) या एसीची किंमत २०,९९० रुपये आहे. तुम्ही दरमहिना ३,४९८ रुपये देऊन नो-कॉस्ट ईएमआयवर खरेदी करू शकता. एसीवर ४,३५० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर देखील दिली जात आहे. सिटीबँक क्रेडिट व डेबिट कार्डवर १० टक्के इंस्टंट डिस्काउंट मिळेल. लॉयडचा हा एसी नॉन-एनव्हर्टर कंप्रेसरसह येतो. कंपनीनुसार, १०० स्क्वेअर फुट आकाराच्या रुमसाठी हा एसी परफेक्ट आहे. यामध्ये क्लिन एअर फिल्टर, एलईडी डिस्प्ले, सेल्फ डायग्नोसिस फंक्शन, ऑटो रिस्टार्ट सारखे फीचर्स मिळतील. AmazonBasics 80cm (32 inch) HD Ready AB32E10SS (Black) (2020 Model) या स्मार्ट एलईडी टीव्हीची किंमत १६,४९९ रुपये आहे. या ३२ इंच एचडी रेडी स्मार्ट टीव्हीला तुम्ही १,३७५ रुपयांच्या नो-कॉस्ट ईएमआयवर खरेदी करू शकता. टीव्हीवर ३,९८० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर मिळत आहे. सिटीबँक क्रेडिट/डेबिट कार्डवर १,५०० रुपयांपर्यंत इंस्टंट डिस्काउंट मिळेल. टीव्हीमध्ये एचडी रेडी स्क्रीन देण्यात आली असून, याचा रिफ्रेश रेट ६० हर्ट्ज आहे. टीव्ही बिल्ट-इन अॅलेक्सा सपोर्ट देण्यात आला असून, यात फायर टीव्ही ओएस देण्यात आले आहे. याशिवाय प्राइम व्हिडीओ, नेटफ्लिक्स, हॉटस्टार अॅप्सचा सपोर्ट मिळेल. 80 cm (32 inches) HD Ready Android Smart LED TV 4A PRO | L32M5-AL (Black) या स्मार्ट टीव्हीची किंमत १६,९९९ रुपये असून, टीव्हीला २,८३३ रुपये प्रति महिना नो-कॉस्ट ईएमआयवर खरेदी करू शकता. लिस्टिंग पेजवर ७५० रुपयांचे कूपन अॅप्लाय करून सूटचा लाभ घेऊ शकता. एचडीएफसी बँक कार्डसह १० टक्के इंस्टंट डिस्काउंट मिळते. पे बॅलेंसद्वारे पेमेंट केल्यास ७५० रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळेल. या टीव्हीमध्ये ६० हर्ट्ज रिफ्रेश रेट स्क्रीन आणि २० वॉट साउंड आउटपूट मिळतो. टीव्हीत नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडीओ आणि डिज्नी+ हॉटस्टार सारखे अॅप्स इंस्टॉल मिळतात. अँड्राइड टीव्ही ९.० वर काम करतो. Voltas 0.75 Ton 2 Star Window AC (Copper 102 EZQ White) या एसीची किंमत १८,३९० रुपये आहे. तुम्ही दरमहिना २,०३३ रुपये देऊन नो-कॉस्टवर या ईएमआयला खरेदी करू शकता. याशिवाय ४,३५० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर आणि सिटीबँक क्रेडिट व डेबिट कार्डवर १० टक्के इंस्टंट डिस्काउंट मिळेल. या विंडो एसीची क्षमता ०.७५ टन आहे. यामध्ये कॉपर कंडेसर कॉइलचा उपयोग करण्यात आला असून, डस्ट फिल्टर वर डीह्यूमिडफायर सारखे फीचर्स मिळतील. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3jZV7Gc