नवी दिल्ली : ड्रोनचा वापर वेगवेगळ्या कामांसाठी वाढताना दिसत आहे. सुक्षा, शेती, ई-कॉमर्सपासून ते आपत्ती व्यवस्थापनात ड्रोनची मदत घेतली जाते. यामुळे विकास कार्य आणि संकटग्रस्त भागांच्या सर्वेक्षण करण्याचा खर्च देखील कमी होते. आर्टिफिशियल इंटेलिजेंस आणि मशीन लर्निंगच्या मदतीने मानवी धोका कमी केला जात आहे. मात्र, आता ड्रोनशी संबंधित नियम बदलण्याची चर्चा सुरू आहे. जेणेकरून, ड्रोनची मालकी, रुट आणि त्याद्वारे कलेक्ट केल्या जाणाऱ्या गोष्टींबाबतची माहिती मिळू शकेल. ला आणि नागरी उड्डाण महासंचालनालयकडून तयार करण्यात आले आहेत. वाचाः ड्रोन नियम २०२१
- ड्रोनचे नियम संरक्षण म्हणजे नौदल, लष्कर आणि हवाई दलासाठी लागू नसतील. इतर सर्वांसाठी हे नियम लागू असतील.
- सर्व ड्रोन्सला ऑनलाइन नोंदणी करावी लागेल. तसेच, ड्रोनच्या उड्डाणाबाबत माहिती द्यावी लागेल.
- ड्रोनमध्ये २५० ग्रॅम किंवा त्यापेक्षा कमी वजनाचे नॅनो उपकरण, २५० ग्रॅम ते २ किलोपर्यंत मायक्रो उपकरण लावता येतील. लहान २ किलो ते २५ किलो वजन असतील. मध्यम ड्रोन २५ ते १५० किलोचे असतील.
- मोठे ड्रोन १५० किलो ते ५०० किलो असू शकतील. ५०० किलोंपेक्षा अधिक वजनाचे ड्रोन विमान नियम १९३७ चे पालन करतील.
- कोणतीही संस्था अथवा व्यक्तीला ड्रोन उडवण्यासाठी प्रमाणपत्र घ्यावे लागेल. हे योग्यता प्रमाणपत्र क्वालिटी काउंसिल ऑफ इंडिया किंवा त्यासंबंधित केंद्राद्वारे जारी केले जाईल.
- प्रत्येक ड्रोनसाठी एक विशिष्ट ओळख क्रमांक असावा. जो डिजिटल स्काय प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सेल्फ-जनरेट केले जाईल. हा नबंर जुन्या व नवीन दोन्ही ड्रोनसाठी अनिवार्य असेल.
- ड्रोनचे हस्तांतरण अथवा नोंदणीकरण रद्द करण्याचे काम संबंधित डिजिटल फॉर्मच्या माध्यमातून केले जाईल.
- ड्रोनला कोठेही उडवता येणार नाही. यासाठी डिजिटल स्कायल प्लॅटफॉर्मवर एक इंटरॅक्टिव्ह एअरस्पेस मॅप देईल. यात झोनची माहिती मिळेल. झोनच्या श्रेणीत बदल केला जाऊ शकतो.
- ग्रीन झोन : सुरक्षित एअरस्पेस आहे.
- येलो झोन : मर्यादित क्षेत्र आहे.
- रेड झोन: केवळ विशेष परिस्थितीमध्येच परवानगी मिळेल.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3yMV5aW