Full Width(True/False)

Discount Offer: Xiaomi च्या 'या' सर्वात स्लीम स्मार्टफोनला स्वस्तात खरेदीची संधी, पाहा डिटेल्स

नवी दिल्लीः स्मार्टफोनमध्ये पॉप्युलर चीनची कंपनी Xiaomi आपल्या ग्राहकांसाठी लेटेस्ट फीचर्स सोबत नवीन नवीन स्मार्टफोन लाँच करीत आहे. कंपनीने नुकताच यावर्षी आतापर्यंतचा सर्वात स्लीम आणि हलका स्मार्टफोन Mi 11 Lite भारतीय बाजारात लाँच केला होता. हा फोन आता खूपच कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाइटनुसार, Mi 11 Lite ला ग्राहक २० हजार ४९९ रुपयांच्या किंमतीत ऑर्डर करू शकतात. जर तुम्ही एसबीआयच्या कार्डवरून याचे पेमेंट केले तर तुम्हाला १५०० रुपयाचा इंस्टेंट डिस्काउंट मिळेल. वाचाः फोनची फीचर्स Mi 11 Lite स्मार्टफोन मध्ये ६.५५ इंचाचा फुल HD+ AMOLED डिस्प्ले दिला आहे. सोबत यात 90Hz चे रिफ्रेश रेट आणि Gorilla Glass 5 चे प्रोटेक्शन दिले आहे. फोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 732G प्रोसेसर सोबत येतो. फोन अँड्रॉयड ११ ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. या फोनमध्ये 8 GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेज दिले आहे. वाचाः फोनचा कॅमेरा फोटोग्राफीसाठी Mi 11 Lite फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. याचा प्रायमरी कॅमेरा ६४ मेगापिक्सलचा आहे. ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि ५ मेगापिक्सलचा टेलिफोटो मायक्रो लेन्स दिला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. वाचाः पॉवर आणि कनेक्टिविटी पॉवरसाठी फोनमध्ये 4250mAh ची बॅटरी दिली आहे. जी ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. या फोनमध्ये साइड माउटेंड फिंगरप्रिंट सेन्सर आणि ड्युअल स्टिरियो स्पीकर्स सारखे फीचर्स दिले आहेत. कनेक्टिविटीसाठी फोनमध्ये ब्लूटूथ, वाय फाय, जीपीएस आणि यूएसबी सारखे फीचर्स दिले आहेत. हा शाओमीचा आतापर्यंतचा सर्वात हलका फोन आहे. याचे वजन १५७ ग्रॅम आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3AFU2Kr