Full Width(True/False)

पाकिस्तान करत आहे ४जी स्मार्टफोन्सची निर्मिती; पाहा किंमत, कोणते देश खरेदी करत आहेत हा फोन?

नवी दिल्ली : पाकिस्तान मॅन्यूफॅक्चरिंग करत आता हँडसेट निर्यातदार देश बनला आहे. मेड इन असे लिहिलेले फोन आता निर्यात केले जात आहे. पाकिस्तानने मॅन्यूफॅक्चरिंग केलेले हे फोन कोणत्या देशात निर्यात केले जात आहे, याची किंमत काय आहे ? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया. वाचा: पाकिस्तानमध्ये कोणती कंपनी फोन तयार करत आहे ? ही कंपनी पाकिस्तानमध्ये स्मार्टफोन्स तयार करत आहे. यावर्षी एप्रिलमध्ये कंपनीला मोबाइल डिव्हाइस तयार करण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. तसेच, चार महिन्यातच कंपनीने पहिली निर्यात देखील केली आहे. कंपनी कोणते स्मार्टफोन ब्रँड्स तयार करत आहे ? कंपनीचे चीफ एग्झिक्यूटिव्ह झिशान मिआन नूर म्हणाले की, कंपनी चाइनीज ब्रँड्सचे स्मार्टफोन तयार करत आहे. त्यांनी कंपनीच्या नावाचा मात्र खुलासा केला नाही. कोणते देश पाकिस्तानचे स्मार्टफोन्स खरेदी करत आहेत ? पहिल्या कन्साइंमेंटमध्ये ५५०० ४जी स्मार्टफोन्स यूएईला निर्यात करण्यात आले आहे. मिआन नूर म्हणाले की, कंपनीचे लक्ष्य इराक, इराण आणि अफगाणिस्तान सारख्या देशात स्मार्टफोन्स निर्यातीचे आहे. स्मार्टफोन्सची किंमत किती ? कंपनीने अद्याप स्मार्टफोन्सच्या किंमतीचा खुलासा केलेला नाही. मात्र, इराक, इराण आणि अफगाणिस्तानमधील ग्राहक मोबाइल १०० डॉलर्सपर्यंतचे फोन्स खरेदी करतात. पाकिस्तान टेलिकम्यूनिकेशन अथॉरिटीकडून इनोव्ही टेलिकॉमचे अभिनंदन पाकिस्तान टेलिकम्यूनिकेशन अथॉरिटीने कंपनीचे या कामासाठी अभिनंदन केले असून, भविष्यात निर्यातीत वाढ होईल असेही म्हटले आहे. मोबाइल डिव्हाइस मॅन्यूफॅक्चरिंगच्या बाबतीत देशात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या डेव्हलपमेंटमुळे हे शक्य झाल्याचे देखील निवेदनात म्हटले आहे. पाकिस्तान केले जात आहे , , , चे स्मार्टफोन असेंबल रिपोर्टनुसार, लकी मोटर कॉर्पोरेशनने पाकिस्तानमध्ये स्मार्टफोन्सच्या निर्मितीसाठी सॅमसंग गल्फ इलेक्ट्रॉनिक्ससोबत करार केला आहे. टेक्नो पॅक टेलिकॉमचे सीईओ आमिर अल्लावाला म्हणाले की, पाकिस्तानात आधीपासूनच Tecno, Infinix, Itel, Vivo, Oppo आणि Realme च्या स्मार्टफोन्सचे उत्पादन सुरू आहे. तर सप्टेंबर २०२१ मध्ये नोकिया देखील आपला प्लांट उभारणार आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3m9YSLR