नवी दिल्लीः Oppo सध्या आपल्या एका नवीन स्मार्टफोनला लाँचिंग करण्याची तयारी करीत आहे. कंपनीच्या या नवीन डिव्हाइसचे मॉडल नंबर PEYMoo आहे. रिपोर्ट्च्या माहितीनुसार, ओप्पोच्या या स्मार्टफोनचे नाव K9 Pro आहे. फोनवरून नवीन माहिती समोर आली आहे. यानुसार, आता TENAA सर्टिफिकेशन वेबसाइटवर लिस्ट झाला आहे. या लिस्टिंगमध्ये फोनची डिझाइन आणि खास स्पेसिफिकेशन्सचा खुलासा करण्यात आला आहे. जाणून घ्या डिटेल्स. वाचा: फोनमध्ये मिळेल फुल एचडी+ AMOLED डिस्प्ले ओप्पो K9 प्रो मध्ये कंपनी 1080x2400 पिक्सल रेजॉलूशन सोबत ६.४३ इंचाचा फुल एचडी प्लस अमोलेड डिस्प्ले ऑफर करणार आहे. याचा आस्पेक्ट रेशियो २०.९ असेल. फोनमध्ये पंच होल डिस्प्ले डिझाइन आणि स्लीम बेजल्स सोबत येईल. फोनच्या बॅक पॅनेलवर कॅमेरा युनिट दिला आहे. या ठिकाणी '09-K Pro' ची ब्रँडिंग आहे. कंपनीचा हा फोन सिल्व्हर, ब्लॅक, आणि ब्लू कलर ऑप्शन मध्ये येईल. वाचा: ओप्पोचा हा फोन १२ जीबी पर्यंत रॅम आणि २५६ जीबीपर्यंत इंटरनल स्टोरेज सोबत येईल. प्रोसेसर म्हणून या फोनमध्ये मीडियाटेक डाइमेंसिटी 1200 चिपसेट ऑफर करणार आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये बॅक पॅनेलवर एलईडी फ्लॅश सोबत ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला आहे. यात ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सोबत एक ८ मेगापिक्सलचा सेकंडरी लेन्स आणि एक २ मेगापिक्सलचा टर्शिअरी कॅमेरा दिला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये कंपनी १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा ऑफर करणार आहे. वाचा: फोनला पॉवर देण्यासाठी यात 4400mAh ची बॅटरी दिली जाणार आहे. जी फास्ट चार्जिंग सपोर्ट करेल. हा फोन अँड्रॉयड ११ वर बेस्ड ColorOS वर काम करेन. कनेक्टिविटीसाठी फोनमध्ये वाय फाय ६, ब्लूटूथ ५.२, जीपीएस आणि यूएसबी टाइप सी पोर्ट सारखे ऑप्शन मिळू शकते. या फोनची सुरुवातीची किंमत २५ हजार रुपयाच्या जवळपास असू शकते. वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3ASEHWU