मुंबई- छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम '' मधील मुख्य परीक्षक गेले काही आठवडे कार्यक्रमापासून दूर आहे. राज कुंद्रा याला झालेल्या अटकेनंतर शिल्पाने 'सुपर डान्सर ४' च्या चित्रीकरणासाठी नकार दिला होता. त्यानंतर प्रत्येक आठवड्याला कार्यक्रमात निरनिराळे कलाकार पाहुणे परीक्षक म्हणून दिसत आहेत. या आठवड्यात प्रेक्षकांची बॉलिवूडमधील आवडती जोडी आणि कार्यक्रमात पाहुणे परीक्षक म्हणून हजेरी लावणार आहेत. यादरम्यान, जेनेलिया त्यांच्या लग्नाच्या वेळेचा किस्सादेखील प्रेक्षकांना सांगणार आहे जेव्हा रितेश जेनेलियाच्या तब्बल आठवेळा पाया पडला होता. 'सुपर डान्सर ४' मधील हा आठवडा लग्न स्पेशल असणार आहे. प्रोमोमध्ये दाखवण्यात आल्याप्रमाणे, स्पर्धकांचे नृत्य पाहिल्यानंतर जेनेलियाला तिच्या लग्नातील प्रसंगांची आठवण येते. जेनेलिया म्हणते, 'अरे देवा! या सगळ्यांचं सादरीकरण पाहून मला माझं लग्न आठवलं. आता आपण भलेही लग्न मोठ्या दिमाखात आणि वेगळ्या स्टाइलने साजरं करायला लागलो आहोत परंतु, पारंपरिक पद्धतीने होणाऱ्या लग्नासोबत माझ्या भावना जोडलेल्या आहेत. मला आनंद आहे की माझं लग्न अशाच पद्धतीने झालं. आमच्या लग्नातील प्रत्येक समारंभ एक जबरदस्त धमाका होता. मी पाठवणी करताना खूप रडले होते आणि हो, रितेशला माझ्या पाया पडावं लागलं होतं.' पुढे बोलताना जेनेलिया म्हणाली, 'रितेश तब्बल आठवेळा माझ्या पाया पडला होता. आठवेळा.' यावर हसत रितेश म्हणतो, 'मला वाटतं की भटजींना माहीत होतं की पुढे आयुष्यभर मला काय करायचंय. त्यामुळे त्यांनी तेव्हाच माझ्याकडून प्रॅक्टिस करवून घेतली.' महाराष्ट्रात काही भागात लग्नात नवरदेवाने नवरीच्या पाया पडण्याची प्रथा आहे. रितेश यांच्या घरातदेखील ही प्रथा असल्याने रितेशला जेनेलियाच्या पाया पडावं लागलं होतं. हे ऐकून तिथे उपस्थित सगळेच आश्चर्यचकित झाले होते.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3C1HmPA