मुंबई: गेल्या काही दिवसांपासून '' या मालिकेची प्रचंड चर्चा सुरू आहे. मालिका बंद होणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. पण मालिकेत नवीन पात्रांची एन्ट्री झाल्यामुळं प्रेक्षक गोंधळले होते. आता मात्र मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं नक्की झालं आहे. अनेक नवीन मालिकांचे प्रोमो पाहायला मिळत आहेत. '' मालिकेचा नुकताच प्रोमो रिलीज झाला आहे. देवमाणूसच्या वेळेत आता ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. १४ किंवा १५ ऑगस्ट रोजी देवमाणूस मालिकेचा शेवटचा एपिसोड प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. नवीन मालिकेची उत्सुकता'ती परत आलीये' मालिकेचा नुकताच प्रोमो रिलीज झाला आहे. या मालिकेत ज्येष्ठ अभिनेते विजय कदम एका वेगळ्या आणि लक्षवेधी भूमिकेत दिसणार असून प्रदीर्घ कालावधीनंतर ते टीव्हीवर पुनरागमन करत आहेत. या मालिकेच्या प्रोमोमध्ये एका परिसरामध्ये हत्या घडत असल्याने त्या परिसरात विजय कदम गस्त घालताना दिसत आहेत. या मालिकेत ज्येष्ठ अभिनेते विजय कदम एका वेगळ्या आणि लक्षवेधी भूमिकेत दिसणार असून प्रदीर्घ कालावधीनंतर ते टीव्हीवर पुनरागमन करत आहेत. या मालिकेच्या प्रोमोमध्ये एका परिसरामध्ये हत्या घडत असल्याने त्या परिसरात विजय कदम गस्त घालताना दिसत आहेत.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3rLJdTS