मुंबई : ' राजा रानीची गं जोडी' ही मालिका सध्या रंजक वळणावर आहे. मालिकेत संजूनं अनेक अडथळे पार करत रणजीतची निर्दोष सुटका केली. संजीवनीच्या प्रयत्नांना अखेर यश मिळालं. रणजीत घरी परतला असून येत्या भागात त्याच्या मदतीनं संजू गुन्हेगारांना धडा शिकवताना दिसणार आहे. पण त्याआधी मालिकेत काही रोमँटिक क्षण अनुभवायला मिळणार आहेत. पुन्हा एकदा राजा-रानीच्या आयुष्यात आनंदाचे क्षण येणार यात शंका नाही. संजू रणजीतला डेटवर घेऊन जाणार आहे. यासाठी राजा-रानी एकदम हट के लूकमध्ये दिसणार आहेत. या डेटसाठी संजूनं खास तयारीदेखील केली आहे. रणजीतसाठी तिनं बऱ्याच सरप्राइजचा बेत आखलाय. येत्य आठवड्यात तो प्रत्यक्षात कसा उतरतो हे बघण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3iexry3