Full Width(True/False)

'आई कुठे काय करते'- लग्न झालं संजनाचं गृहप्रवेश मात्र अरुंधतीचा

मुंबई : मराठी मालिकांच्या विश्वामध्ये '' ही मालिका खूपच लोकप्रिय ठरली आहे. यातील प्रत्येक पात्राने आपल्या भूमिकांना योग्य तो न्याय दिला. या कलाकारांचे अभिनय, मालिकेचे कथानक आणि त्यातील संवाद यांमुळे ही मालिका प्रेक्षकांमध्ये अल्पावधीतच लोकप्रिय झाली आहे. सध्या या मालिकेचे कथानक मोठ्या रंजक टप्प्यावर येऊन ठेपले आहे. त्यामुळे मालिकेत आता पुढे काय घडणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आई कुठे काय करते या मालिकेचा सोमवारी प्रसारित झालेल्या महासोमवार विशेष भागामध्ये संजनाने अट्टाहासाने अनिरुद्धसोबत लग्नाचा बेत रचला. रंतु लग्नाच्या ऐनवेळेला अनिरुद्ध घरातून गायब होतो. त्यामुळे सैरभैर झालेली संजना देशमुखांच्या समृद्धी बंगल्यात येते आणि घरातील सर्वांना अद्वातद्वा बोलू लागते. त्याचवेळी अरुंधती डॉक्टरांकडे जाणे रद्द करून घरी परत येते. सर्व देशमुख कुटुंबावर तोंडसुख घेणाऱ्या संजनाची ती बोलती बंद करते. त्याचवेळी तिला अनिरुद्धचा फोन येतो. त्याला तिच्याशी बोलायचे आहे, असे तो सांगतो. तेव्हा ती त्याला घरी येऊन बोला असे स्पष्टपणे सांगते. अरुंधतीच्या सांगण्यावरून अनिरुद्ध घरी येतो. त्याला पाहून संजनाचा तोल जातो आणि ती संतापाच्या भरात अनिरुद्धच्या कानशिलात मारते आणि त्याला त्याच्या कृत्याचा जाब विचारते. त्यावर अनिरुद्धही तिला सांगतो की त्याला संजनाशी लग्न करायचे नाही. त्याच्या आयुष्यात बायकोची जागा केवळ अरुंधतीचीच आहे, त्या जागी तो अन्य कुणालाही पाहू शकत नाही. परंतु त्यानंतरही संजना त्याच्याशी लग्न करण्याचा हेका सोडत नाही. इतकेच नाही तर ती पोलिसांत तक्रार करण्याची धमकी देते. अखेर अनिरुद्धची आई कांचन त्याला हात जोडून विनंती करते आणि सांगते की, आधीच घराची खूपच नाचक्की झाली आहे. आता पोलिसांना या घराची पायरी चढून देऊन आणखी नाचक्की करू नकोस. अखेर नाईलाजाने अनिरुद्ध संजनासोबत लग्न करतो. मालिकेच्या आगामी भागाच्या रिलीज झालेल्या प्रोमोमध्ये अनिरुद्ध आणि संजनाचे लग्न होताना दिसते आहे. संजनाला आता समृद्धी बंगल्यात गृहप्रवेशाचे वेध लागलेले असल्याने ती तिथे जाण्याचा हट्ट करताना दिसणार आहे. तर अनिरुद्ध तिला तसे न करण्यासाठी विनवणी करत आहे. आपण दुसरीकडे रहायला जाऊ, असे तो तिला सांगतो. परंतु संजना बंगल्यामध्ये गृहप्रवेश करण्यावर ठाम असते. अखेर हे दोघे घराच्या उंबरठ्यावर उभे राहतात. त्याचवेळी अरुंधती ईशाला घेऊन डोंबिवलीला जाते. संजना आणि अनिरुद्धला उंबरठ्यावर उभे राहिलेले पाहताच कांचनचा संताप अनावर होतो आणि ती या दोघांना घरात घेणार नसल्याचे ठामपणे सांगते. हे सांगत असतानाच कांचनला हार्टअॅटॅक येतो आणि ती जमिनीवर कोसळते. ते पाहून अनिरुद्ध धावत आत जातो. कांचनचा आवाज ऐकून अरुंधती मागे वळते आणि घरात आतमध्ये येताना संजनाच्या गृहप्रवेशासाठी निलीमाने भरून ठेवलेले माप ओलांडले जाते.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3mNNTbe