Full Width(True/False)

अनर्थ टळला! शूटिंगदरम्यान अभिनेते मिलिंद शिंदे थोडक्यात बचावले

मुंबई: करोना लॉकडाउनच्या सर्व नियमांचे पालन करत सिनेसृष्टीत शूटिंग सुरू झालं आहे. गेल्या काही महिन्यांपासून सिनेसृष्टी सावरण्याचा प्रयत्न करत आहे. असं असलं तरी शूटिंगदरम्यान अनेक घटना घडताना दिसत आहेत. अभिनेते यांच्यासोबतही अशीच एक घटना घडली असून शूटिंगदरम्यान ते थोडक्यात बचावल्याचं समोर आलं आहे. मिलिंद शिंदे एका आगामी मराठी चित्रपटासाठी शूटिंग करत होते. सीनसाठी ते तयारी करत असताना सेटवर असलेली शूटिंगसाठी लागणारी मोठी क्रेन त्यांच्या अंगावर कोसळणार होती, पण सुदैवानं ते थोडक्यात बचावले. काय घडलं नेमकं सेटवर?लाईट्स, जिमी जीब क्रेन्स, मल्टिकॅमेरा सेटअप अश्या अनेक अवजड उपकरणांच्या साहाय्यानं रात्रीच्या वेळी चित्रपटाच्या शूटिंगचं काम सुरु होणार होतं. मिलिंद शिंदे आपल्या भूमिकेमध्ये मग्न होऊन सीनसाठी तयारी करत होते, ते आपल्या तयारीमध्ये इतके गुंतले होते की आजूबाजूला कोणत्या गोष्टी चालू आहेत याकडं त्यांचं लक्षच नव्हतं. सेटवर जिमी जीब कॅमेराचा सेटअप लावलेला होता, कॅमेरा टीमही जिमी जीबवर पुढील मंद प्रकाशातील शॉटच्या चित्रीकरणाचा सराव करत होती. या शॉटच्या सरावात टीम इतकी गुंतली होती की कोणालाचं आपल्या सरावात मग्न असलेले मिलिंद शिंदे हे क्रेन ज्या दिशेने खाली येणार होती नेमके तिथेचं उभे होते हे समजलं नाही. परंतु जिमी जीब क्रेन नियंत्रित करणाऱ्या ऑपरेटरला खाली उभे असलेले मिलिंद शिंदे दिसले आणि सरावादरम्यान वेगाने खाली येणाऱ्या जिमी जीब क्रेनला त्यानं अगदी चपळाईनं नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत दुसऱ्या बाजूला वळवली. नेमक्या त्याच क्षणी मिलिंद शिंदें खाली वाकले आणि थोडक्यात बचावले. जिमी जीब ऑपरेटरने प्रसंगावधान दाखवून ती क्रेन नियंत्रित केली म्हणून होणारा भयंकर अनर्थ टळला.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3xlMyub