नवी दिल्ली: फीचर फोनबाबत पुन्हा एकदा माहिती समोर आली असून यावेळी Nokia 400 फीचर फोनचा हँड-ऑन व्हिडिओ लीक झाला आहे. यापूर्वी, अनेक अहवालांमध्ये असे म्हटले होते की, अँड्रॉइड ओएस असलेला नोकिया फोन यापुढे येणार नाही, परंतु नवीन व्हिडिओ त्याची उपस्थिती दर्शवतो. पाहा डिटेल्स. वाचा: Nokia 400 फीचर फोनविषयीच्या बातम्या एप्रिल २०१९ मध्ये आल्या. त्यावेळी हे उघड झाले होते की गूगल विशेषतः फीचर फोनसाठी अँड्रॉइड व्हर्जन तयार करत आहे. त्यानंतर आलेल्या एका व्हिडिओमध्ये असे सूचित करण्यात आले आहे की नोकिया आधीच आपल्या फीचर फोनला नवीन अँड्रॉइड व्हर्जन देत आहे. ही माहिती समोर आल्यानंतर हे डिव्हाईस Nokia 400 या नावाने लाँच केले जाईल आणि ते गुगल अँड्रॉइडवर चालणार असल्याचे उघड झाले. मात्र, डिव्हाइसबद्दल अद्याप माहिती उघड झाली नाही. हा फोन सामान्य फीचर फोनसारखा दिसतो. यात एक छोटा डिस्प्ले, टी ९ कीपॅड, काढता येईल असे बॅक पॅन आणि आहे. नोकिया फीचर फोनची जवळ जवळ सर्व मूलभूत कार्ये फोनमध्ये दिसू शकतात. Nokia 400 Apps Nokia 400 च्या स्क्रीनवर गुगल असिस्टंट सपोर्ट इतर अनेक अॅप्ससह उपलब्ध आहे. आयकॉन ट्रेमध्ये गुगल क्रोम ब्राउझर, यूट्यूब, शेअर आणि कॅमेरा आयकॉन आहेत. अॅप संग्रह उघडण्यासाठी मध्यभागी एक बटण देण्यात आले आहे. एअरटेल अॅप्स पूर्व-स्थापित अॅप ड्रॉवरमध्ये मिळू शकतात. याशिवाय फाईल मॅनेजर, कॅल्क्युलेटर, घड्याळ, गॅलरी अशी अनेक वैशिष्ट्ये आहेत. नोकिया 400 फोन ५१२ MB रॅमसह Android ८.१ .० Oreo वर चालतो. सध्या Nokia 400 फीचर फोनशी संबंधित या व्हिडिओची पडताळणी झालेली नाही. तसेच त्याची किंमत आणि उपलब्धता याबद्दल कोणतेही संकेत दिले गेले नाहीत असे वृत्त आहेत की Nokia 400 विशेषतः भारतीय बाजारासाठी बनवले गेले आहे. खासकरून जर तुम्ही त्यामध्ये दिसणारे प्री-इंस्टॉल केलेले अॅप्स बघितले तर. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2WKb6Ad