मुंबई : आणि हे गेले अनेक दिवस त्यांच्या व्यावसायिक कमिटमेंटमध्ये व्यग्र होते. त्यामुळे ते अनेक महिने एकमेकांपासून दूर होते. परंतु आता हे दोघेजण एकत्र आले असून सध्या ते एकमेकांसोबत क्वालिटी टाईम घालवत आहेत. प्रियांकाने दोघांचे काही फोटोही सोशल मीडियावर शेअर केले. या फोटोंमध्ये हे दोघेजण स्विमिंग पूलच्या बाजूला दिसत आहे. एका फोटोमध्ये प्रियांका सनबाथ घेताना दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये प्रियांका पालथी पहुडली आहे तर तिच्या मागे निक दिसत आहे. त्याच्या हातात काटा आणि सुरी दिसत आहे. हे फोटो पाहून काही चाहत्यांनी आवडल्याचे सांगितले आहे तर काहींनी प्रियांकाला ट्रोल करत तिच्यावर टीका केली. प्रियांकाने स्वत:चा एक वेगळा फोटोही शेअर केला आहे ज्यात ती तिच्या फिट बॉडीची झलक दाखवत आहे. हा फोटो पाहून निकनेही अभिनेत्रीला आपले हृदय दिले. त्याने या फोटोमध्ये हार्ट इमोजी पोस्ट केला. परिणिताने दिली अशी प्रतिक्रिया प्रियांकाने निकसोबतचे फोटो शेअर केलेले पाहून तिची बहीण परिणीती चोप्राला आश्चर्याचा धक्का बसला. ती म्हणाली, 'जीज, मिमी दीदी. हे काय करताय तुम्ही? आपलं सर्व कुटुंबही इन्स्टाग्रामवर आहे. मी तर डोळे मिटून लाईक बटण दाबले आहे.' दरम्यान, प्रियांका नुकतीच अमेरिकेत परत गेली आहे. तिथे गेल्यानंतर जोनस ब्रदर्सच्या कॉन्सर्टलाही ती गेली होती. या मैफिलीतील प्रियांकाचे फोटोही चाहत्यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3zwsmrp