Full Width(True/False)

माधुरी दीक्षितचं पुनरागमन, वैयक्तिक कारणांमुळे होती दूर

मुंबई : अभिनेत्री '' या डान्स रिअॅलिटी कार्यक्रमासाठी परीक्षकाची जबाबदारी सांभाळत आहे. परंतु काही आठवड्यांपासून ती या कार्यक्रमापासून दूर होती. तिच्या जागी नोरा फतेही, दलेर मेहंदी आणि मीका सिंग कार्यक्रमात सहभागी झाले होते. कार्यक्रमातील स्पर्धकांनी आपल्या नृत्य कौशल्य दाखवत त्यांची मनं जिंकली. माधुरी दीक्षित काही व्यक्तिगत कारणामुळे कार्यक्रमात सहभागी झाली नव्हती. परंतु ती आता या कार्यक्रमात सहभागी होणार आहे. माधुरी होणार कार्यक्रमात सहभागी डान्स दिवाने ३ च्या पुढील आठवड्यामध्ये प्रसारित होणाऱ्या भागात माधुरी दीक्षित परीक्षक म्हणून सहभागी होणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ ऑगस्टपासून माधुरी कार्यक्रमात परतणार आहे. या कार्यक्रमाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्ताने प्रसारित होणाऱ्या खास भागामध्ये ऑलिम्पिकमध्ये वेटलिफ्टिंग प्रकारात रौप्य पदक मिळवलेली मीराबाई चानू प्रमुख पाहुणी म्हणून सहभागी होणार आहे. डान्स दिवाने ३ च्या कार्यक्रमात आतापर्यंत अनेक बॉलिवूडमधील दिग्गज कलाकार प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले आहेत. कार्यक्रमातील तीन परीक्षकांपैकी एखादा परीक्षक अनुपस्थित असतो तेव्हा कलाकारांना विशेष पाहुणे म्हणून निमंत्रीत केले जाते.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3xHt8zL