० '' या लघुपटामधली भूमिका तू साकारत असलेल्या नेहमीच्या भूमिकांपेक्षा वेगळी आहे. ती साकारतानाचा अनुभव कसा होता?- प्रत्येक स्त्रीमध्ये अन्यायाविरोधात आवाज उठवण्याची ताकद असते; पण बऱ्याचदा परिस्थिती त्यांना तशी संधी देत नाही. सोनूची आई म्हणजेच सुरेखा ही त्यातलीच एक स्त्री. ती रूढीवादी पुरुषप्रधान परिवारातली आहे. तिथे तिचं अस्तित्व नाही, तिच्या मतांना आणि निर्णयांना किंमत नाही. त्यामुळे तिच्या मुलानं तरी चांगलं आयुष्य जगावं आणि वडिलांसारखं बनू नये यासाठी ती सतत प्रयत्नशील असते. वेगवेगळ्या भूमिका साकारण्याचा माझा प्रयत्न असतो. खऱ्या आयुष्यात मी सुरेखासारखी अजिबात नाही. मी अन्यायाविरोधात आवाज उठवणारी आणी स्वतंत्र जगण्यावर विश्वास ठेवणारी आहे. ० लघुपटात दाखवल्याप्रमाणे तुम्हाला कधी तुला असमानतेचा सामना करावा लागला आहे का ?- खेड्यापाड्यात किंवा शहरात कुठे ना कुठे अशा मानसिकतेचे लोक पाहायला मिळतात. मलादेखील असा अनुभव आला आहे. बऱ्याचदा आई-वडील बोलून जातात की माझी मुलगी तर मुलासारखी आहे. यातून त्यांना नेमकं काय सुचवायचं असतं? मी माझ्या घरी या विषयावरून नेहमी भांडायचे. पिढ्यान् पिढ्या आपल्या मनात रुजवलं आहे की मुलगी म्हणजे परक्या घरची लक्ष्मी असते. ती मानसिकताच आधी पुसून काढायला हवी. मलाही अनेकांनी कमी लेखलं आहे. पण मी माझ्या मतांवर आणी तत्त्वांवर कायम ठाम राहिले आणि तसं जगलेसुद्धा. ० 'पती म्हणजे परमेश्वर आणि पत्नी म्हणजे सेवक' ही मानसिकता लघुपटात दाखवली आहे. तुला याबद्दल काय वाटतं?ौ- काळानुसार जे स्वतःला बदलू शकत नाहीत त्यांच्याविषयी मला फार वाईट वाटतं. स्त्रीला मुठीत ठेवतो तोच खरा पुरुष; हा विचार अजूनही काही लोकांमध्ये खोलवर रुजला आहे. त्यामुळे स्त्रीच्या जगण्यावर आपसूकच बंधन येतात. हा विचारच खूप जुना आणि चुकीचा आहे. बाहेरच्या जगात जे स्वतःचं अस्तित्व टिकवू शकत नाहीत ते घरात पत्नीवर, आई-बहिणीवर पुरुषार्थ गाजवतात. आधीच्या काळातल्या स्त्रिया याविरोधात आवाज उठवू शकत नव्हत्या. पण आज आपण सगळे यावर बोलतो, प्रश्न उचलतो. त्यामुळे हळूहळू आपण बदलतोय. अधिक प्रगल्भ होत आहोत. महिला सबलीकरण या विषयावर बोलण्याची गरज नसेल अशा काळाची मी वाट बघतेय. संकलन : संजना पाटील
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2TZ7Xvx