Full Width(True/False)

दया भाभीनं बिकनी टॉपमध्ये धरला ठेका, तुम्ही म्हणाल 'हे मां माता जी!'

मुंबई : '' या मालिकेतील या भूमिकेतून ने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. गेल्या अनेक दिवसांपासून दिशा या कार्यक्रमात दिसलेली नाही. परंतु आजही दिशाने साकारलेली दया भाभी प्रेक्षकांच्या लक्षात आहे. लवकरच ती मालिकेत पुनरागमन करेल अशी चाहत्यांना अपेक्षा आहे. दरम्यान, दिशा वकानीचा एक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ तारक मेहता मालिकेशी संबंधित नाही. दयाभाभीचा जबरदस्त डान्स व्हिडिओ झाला व्हायरल तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतील सर्वांची लाडकी दया भाभी हे पात्र खूप लोकप्रिय झाले. ही भूमिका सुरुवातीला दिशा वकानी साकारत होती. आहे. दिशा वकानीने या मालिकेत काम करण्यापूर्वी बरीच कामे केली आहेत. त्यातील दिशाचा डान्सचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला आहे. या डान्स व्हिडिओमध्ये आतापर्यंत मालिकेत गरबा डान्स करणारी दया भाभी म्हणजे दिशा वकानी चक्क स्कर्ट आणि बिकीनीमध्ये 'भिगरी गा भिगरी' या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. दिशाचा हा अंदाज पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. या व्हिडिओमध्ये दिशा वकानीने डार्क ब्लू रंगाचा स्कर्ट आणि बॅकलेस चोली स्टाइलचा टॉप घातला आहे. या व्हिडिओमध्ये दिशा खूपच बोल्ड अंदाजात दिसत असून हा डान्स व्हिडिओ बराच जुना आहे. यामध्ये दिशा ग्रुप डान्स करताना दिसत आहे. दिशा तिच्या को- स्टारला डान्समध्ये चांगलीच टक्कर देताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहताना ही दया भाभी आहे, यावर कुणाचाही विश्वासच बसणार नाही इतकी ती वेगळी दिसत आहे. दिशाचा हा डान्स व्हिडिओवर युझर्स कमेन्ट करत आहेत. हा व्हिडिओ पाहून एका युझर्सने तर लिहिले 'हे माँ माताजी!' तर अन्य एका युझर्सने लिहिले की, 'टप्पूची आई बिघडली..' तर दुसऱ्या युझरने लिहिले 'जेठालालला सांगू का?' तर काही युझर्सना दिशाचा डान्स आवडला आहे. दरम्यान, याआधीही दिशा वकानीचा एक डान्स व्हायरल झाला होता. त्यात तिने कोळी डान्स केला होता. बाळंतपणानंतर तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेत दयाबेन म्हणजे दिशा वकानी दिसलेली नाही.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3kbVNIC