नवी दिल्लीः जर वोडाफोन आयडियाचे तुम्ही युजर्स असाल तर ही बातमी तुमच्यासाठी असून तुम्हाला झटका देणारी आहे. (Vi) ने भारतात आपला सर्वात स्वस्त प्लानला बंद केले आहे. कंपनीने भारतातील अनेक भागात ४९ रुपयांचा प्रीपेड प्लान बंद केला आहे. वोडाफोन आयडियाचा हा प्लान सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान होता. आता या प्रीपेड रिचार्ज प्लानला बंद केल्यानंतर ग्राहकांना आता कमीत कमी ७९ रुपयाचा रिचार्ज करावा लागणार आहे. आता ७९ रुपयाच्या प्लानमध्ये तुम्हाला कोण कोणती सुविधा मिळते, हे जाणून घ्या. वाचा: वोडाफोन आयडियाचा ४९ रुपयाच्या प्लानमध्ये मिळत होते हे फायदे वोडाफोन आयडियाच्या ४९ रुपयाच्या प्लानमध्ये युजर्संना १४ दिवसासाठी ३८ रुपयाचा टॉकटाइम आणि १०० एमबी डेटा दिला जात होता. या प्लानसोबत कोणत्याही एसएमएसची सुविधा दिली जात नव्हती. वोडाफोन आयडियाचा ७९ रुपयाचा प्लानमध्ये मिळणारे फायदे वोडाफोन आयडियाचा ७९ रुपयाचा प्रीपेड प्लान मध्ये २०० एमबी डेटा, ६४ रुपयाचा टॉकटाइम आणि २८ दिवसाची वैधता मिळते. या प्लानसोबत कोणतीही एसएमएसची सुविधा दिली जात नाही. ४९ रुपयाच्या प्लानच्या तुलनेत ७९ रुपयाचा प्लान सोबत युजर्संना जवळपास दुप्पट लाभ मिळेल. ही योजना महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश सह निवडक दूरसंचार सर्कलमध्ये दिली जाते. हे कंपनीकडून इनडायरेक्ट रुपाने केली जात असलेली वाढ आहे. युजर्संना जास्त फायदा मिळतो, परंतु, आता त्यांना जास्त खर्च करावा लागणार आहे. एअरटेलने बंद केला ४९ रुपयाचा रिचार्ज प्लान गेल्या महिन्यात वोडाफोन आयडिया फोनच्या आधी एअरटेलने आपला ४९ रुपयाचा प्लान बंद केला होता. त्यासाठी युजर्संना एअरलेट किंवा वोडाफोन आयडियाचा ७९ रुपयाच्या प्लान सोबत रिचार्ज करण्याशिवाय, कोणताही पर्याय नाही. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2W8opdF