मुंबई :करोनाशी लढत असताना महाराष्ट्रावर पूर आणि दरड कोसळण्याचं संकटदेखील ओढावलं. गेल्या महिन्यात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूरानं कहर केला होता. तेथील गावकऱ्यांसाठी अभिनेता सोनू सूदनं मदतीचा हात पुढे केला आहे. , आणि इतर अनेक अंतर्गत भागात मदत पॅकेज तो पाठवत आहे. त्याबद्दल सोनू म्हणाला, 'अनेक गावांना पुराचा फटका बसला आहे. ही सर्व गावं प्रमुख महामार्गांपासून २०-३० किलोमीटर दूर आहेत. त्यामुळे तेथे मदत साहित्य पोहोचलेलं नाही. आम्ही या गावांच्या सरपंचांशी बोललो आहोत. बादल्या, पाणी पिण्याची भांडी, इतर छोटी-मोठी भांडी, चटई, कपडे, खाद्यपदार्थ अशा मूलभूत गरजा असलेल्या गोष्टी पाठवल्या जात आहेत.' क्षेत्रपाल, रुद्राणी, दोंडाशी आणि इतर अनेक गावांना मदत साहित्य मिळणार आहे. हे साहित्य हजाराहून अधिक घरांना पुरवलं जाईल आणि मदत साहित्याचा दुसरा ट्रक चार दिवसांत गावांमध्ये पोहोचेल, असं सांगण्यात आलं. एवढ्या मोठ्या नैसर्गिक आपत्तीला तोंड देऊन पुन्हा एकदा गावकरी आपल्या पायावर उभे राहू शकतील, हा त्यांना मदत करण्यामागचा मुख्य हेतू असल्याचं सांगितलं जातंय.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3AiEqML