Full Width(True/False)

राज कुंद्रा याला जामीन दिलासा नाहीच; मुंबई हायकोर्टाने याचिका फेटाळली

मुंबई : अश्लील चित्रपटांच्या प्रकरणात अटकेत असलेला व्यावसायिक व त्याच्या कंपनीतील आयटी प्रमुख यांना आजही कोर्टान जामीन नाकारला आहे. त्यामुळं राजचा तुरुंगातील मुक्काम आणखी वाढला आहे. या प्रकरणात कुंद्रा व थॉर्प हे १९ जुलैपासून अटकेत आहेत. न्यायदंडाधिकारी न्यायालयाने त्यांचे जामीन अर्ज २८ जुलै रोजी फेटाळले. त्यानंतर त्यांनी अटक कारवाईच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या या याचिका उच्च न्यायालयात केल्या. अटक कारवाईच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या दोघांच्या याचिकांवर २ ऑगस्ट रोजी झालेल्या सुनावणी अंती हा निर्णय राखून ठेवण्यात आला होता. न्या. अजय गडकरी यांनी आज, शनिवारी सकाळी १०.३० वाजता सुनावणी करत या राज कुंद्रा आणि रायन थॉर्प यांचा जामीन नाकारला आहे. शुक्रवारी या दोघांनी मुंबई सत्र न्यायालयातही जामिनासाठी अर्ज दाखल केले असून त्या न्यायालयाने पोलिसांचे उत्तर प्रतिज्ञापत्रावर मागून पुढील सुनावणी १० ऑगस्टला ठेवली आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3ywEOqy